स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान नामांतराचा भाजपचा घाट फसला,‘नमो उद्याना’ला जागा देणार नाही; भगूर नगरपालिकेचे स्पष्टीकरण

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे जन्मस्थळ असलेल्या भगूर येथील त्यांच्या नावाच्या उद्यानाचे ‘नमो उद्यान’ असे नामकरण करण्याचा घाट भाजपने घातला होता. यास शिवसेनेने केलेल्या प्रखर विरोधानंतर नगरपालिका प्रशासन नरमले असून, नमो उद्यानासाठी दुसरी जागा नसल्याचे शासनाला कळवू, असे मुख्याधिकारी सचिन पटेल यांनी सांगितले.
सावरकर उद्यानाच्या नामकरणाचे वृत्त दै. ‘सामना’मध्ये प्रकाशित होताच प्रशासनाचे धाबे दणाणले. हे उद्यान विकासासाठी पर्यटन विकास महामंडळाकडे हस्तांतरीत करण्यात आले आहे. नमो उद्यानाचा निधी तेथे वापरता येणार नाही. नव्याने उद्यान विकसित करण्यासाठी दुसरी जागा नाही, असा अहवाल शासनाला पाठविण्यात येईल, असे नगरपालिका मुख्याधिकारी सचिन पटेल यांनी सांगितले. सावरकर उद्यानाचे नामकरण केल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना शहरप्रमुख काकासाहेब देशमुख यांनी दिला आहे.
Comments are closed.