महाराष्ट्रात मराठा तर यूपी आणि बिहारमध्ये ब्राह्मण शक्तिशाली, गडकरी यांचे वक्तव्य

महाराष्ट्रात मराठा शक्तिशाली आहेत. तसेच उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ब्राह्मणांना महत्त्व आहे. तेथे दुबे, त्रिपाठी, मिश्रा हे सर्वच क्षेत्रांत शक्तिशाली आहेत, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. मी ब्राह्मण जातीचा आहे. परमेश्वराचे माझ्यावर एक उपकार आहेत. आम्हाला आरक्षण नाही, असेही ते म्हणाले.
नागपुरातील हलबा महासंघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मी जातपात मानत नाही. माणूस हा जातीपातीने नव्हे, तर कर्तृत्वाने मोठा होतो. त्या जोरावरच माणूस ओळखला जायला हवा. हलबा समाजातील मुलांनाही चांगले शिक्षण घेऊन आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक प्रगती करावी. त्यासाठी समाजातील प्रतिष्ठत लोक काम करत असल्याचेही गडकरी म्हणाले.
Comments are closed.