साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 21 सप्टेंबर 2025 ते शनिवार 27 सप्टेंबर 2025

>> नीलिमा प्राचार्य

मेष – उतावळेपणा नको

चंद्र, शुक्र लाभयोग, चंद्र, गुरू त्रिकोणयोग. देवीचा नवरात्र प्रारंभ होत आहे. कोणतेही भाष्य करताना उतावळेपणा नको. अहंकार नको. नोकरीच्या कामात चूक टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात टिकून रहा. कायदा पाळा. अहंकार टाळा. शुभ दिवस? 24, 25

वृषभ – चौफेर महत्त्व वाढेल

सूर्य, हर्षल त्रिकोणयोग, मंगळ, नेपच्यून षडाष्टक योग. श्रीजगन्मातेच्या आराधनेने समस्या सोडवता येईल. चौफेर तुमचे महत्त्व वाढेल. नोकरीत तणाव वाढवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजना पूर्ण करण्याची जिद्द ठेवा. शुभ दिवस? 22, 23

मिथुन – योग्य व्यवहार करा

चंद्र, शुक्र लाभयोग, चंद्र, मंगळ युती. कोणतीही समस्या सोडवण्यापूर्वी विचार करा. कायद्याच्या चौकटीत राहून व्यवहार करा. जगतजननीच्या आराधनेने आत्मविश्वास वाढेल. धंद्यात हिशेब तपासा. चांगले यश मिळेल. शुभ दिवस? 23, 24

कर्क – कामात यश मिळेल

सूर्य, हर्षल त्रिकोणयोग, चंद्र, मंगळ युती. अर्धवट राहिलेला व्यवहार पूर्ण करा. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. सहनशिलता ठेवा. प्रवासात सावध रहा. धंद्यात वाढ होईल. गैरव्यवहार नको. लोकप्रियता वाढेल. कठीण कामे करा. शुभ दिवस? 22, 23

सिंह – प्रगतीची संधी लाभेल

सूर्य, हर्षल त्रिकोणयोग, चंद्र, बुध युती. नवरात्र उत्सवात चांगली घटना घडेल. प्रगतीची संधी सोडू नका. नोकरीत लाभ होईल. नवे कंत्राट मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्याचा गौरव होईल. कठीण समस्या लवकर सोडवा. शुभ दिवस? 22, 22

कन्या – व्यवहार चातुर्य वापरा

सूर्य, हर्षल त्रिकोणयोग, चंद्र मंगळ युती. श्रीदेवीची आराधना मनोभावे करा. भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. वाद टाळा. व्यवहारचातुर्याचा उपयोग करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. शुभ दिवस? 23, 27

तूळ – संयम बाळगा

चंद्र, मंगळ युती, चंद्र शुक्र लाभयोग. उत्सवात मनोभावे पूजन करा. राग आवरा. कायद्याला धरून भाष्य करा. संयमी कृती असू द्या. वरिष्ठांना कमी लेखू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योग्य व्यक्तीची पारख करा. प्रतिष्ठा टिकवा. शुभ दिवस? 26, 27

वृश्चिक – अडचणींवर मात कराल

सूर्य, प्लुटो त्रिकोणयोग, चंद्र, शुक्र लाभयोग. काम मार्गी लागण्याची शक्यता. भगवती मातेच्या कृपेने मनातील इच्छा पूर्ण होईल. अडचणींवर मात कराल. रागावर नियंत्रण ठेवा. वाहन जपून चालवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वाद उद्भवतील. शुभ दिवस? 22, 23

धनु – समस्या सोडवाल

सूर्य, प्लुटो त्रिकोणयोग, चंद्र शुक्र लाभयोग. उत्साह वाढेल. समस्या सोडवता येतील. किचकट काम रेंगाळत ठेवू नका. प्रेरणादायक अनुभव येतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिग्गज नेत्यांशी संवाद साधता येईल. लोकप्रिय व्हाल. शुभ दिवस? 22, 23

मकर – कामात यश मिळेल

सूर्य, प्लुटो त्रिकोण, चंद्र बुध युती. जवळच्या व्यक्ती आत्मविश्वास डळमळीत करतील. मनस्वास्थ्य बिघडेल. कुलदेवीची आराधना बळ देईल. कठीण कामात यश मिळेल. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चातुर्य वापरा. शुभ दिवस? 22, 23

कुंभ – अहंकार दूर ठेवा

चंद्र, मंगळ युती, चंद्र गुरू त्रिकोणयोग. नवरात्रीत मनाची शक्ती वाढेल. अहंकार नको. व्यवहारात फसगत होईल. कायदा पाळा. नोकरीत शब्द जपून वापरा. धंद्यात जम बसवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वाद वाढवू नका. शुभ दिवस? 26, 27

मीन – वाद वाढवू नका

सूर्य, हर्षल त्रिकोणयोग, मंगळ नेपच्यून षडाष्टक योग. वाहनाचा वेग कमी ठेवा. वाद वाढवू नका. नवरात्र उत्सवात मनाची एकाग्रता वाढवा. नोकरीत प्रभाव राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गैरसमज दूर ठेवा. प्रतिष्ठा वाढेल. शुभ दिवस? 22, 23

Comments are closed.