ट्रान्सजेंडरच्या घरी … संपती कुबेरी
सध्या एक व्हिडीओ सोशल मिडियावर लोकप्रिय होत आहे. एका किन्नराच्या घरावर पडलेल्या धाडीत किलोच्या प्रमाणात सोने, बऱ्याच प्रमाणात चांदी आणि लाखो रुपयांची रोख रक्कम सापडल्याचे या व्हिडीओत दर्शविण्यात आले आहे. शीतल यादव नामक एका युजरने हा व्हिडीओ प्रसारित केला असून सध्या त्याची चर्चा आहे. हा व्हिडीओ धाड पडलेल्या किन्नरानेच (तृतीयपंथीय व्यक्ती) बनविलेला असून तो डोळ्यामध्ये आसवे आणून आपल्या घरावर पडलेल्या धाडीची माहिती देताना दिसून येत आहे. प्राप्तीकर विभागाने या किन्नराच्या घरावर टाकलेल्या धाडीत दीड कोटी रुपयांचे दीड किलो सोने, मोठ्या प्रमाणावर चांदी आणि लक्षावधी रुपयांची रोख रक्कम आढळून आली असे या व्हिडीओतून समजून येते. एखाद्या गर्भश्रीमंत माणसाच्या घरातही इतकी संपत्ती एकावेळी आढळून येणार नाही, तितकी या किन्नराच्या घरी हाती लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एका किन्नराजवळ इतकी संपत्ती आली कोठून, हा प्रश्न विचारला जात आहे. अनेक तर्कवितर्क या संबंधात व्यक्त पेले जात आहेत. ही संपत्ती कोणत्यातरी धनिकाची बेहिशेबी संपत्ती असेल आणि त्याने किन्नराच्या घरावर धाड पडणार नाही, अशा समजुतीने ती त्याच्याकडे ठेवण्यासाठी दिली असेल, असेही अनुमान आहे. तथापि, अलिकडच्या काळात एवढा विश्वास कोणावर टाकला जाईल काय, असाही प्रश्न आहे. किन्नरांना काही प्रसंगी दान देले जाण्याची पद्धत आहे. तथापि, केवळ अशा दानातून इतक्या प्रमाणावर संपत्ती गोळा केली जाऊ शकते, हे अनाकलनीय आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतरच सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे. काहींनी या व्हिडीओच्या सत्यतेवरच शंका उपस्थित केली आहे. काहीही असले तरी, तो चर्चेचा विषय बनला आहे, ही बाब खरीच आहे.
Comments are closed.