मैदानावर बॅट-बॉलची लढाई होईल! शेकहॅण्ड वादावर कर्णधार सूर्यकुमारचा स्ट्रेट ड्राईव्ह

आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत हिंदुस्थान-पाकिस्तान दरम्यानच्या गटफेरीतील सामन्यात शेकहॅण्ड वादाने मोठा गदारोळ झाला होता. आता सुपर-४ मध्ये पुन्हा एकदा हे कट्टर प्रतिस्पर्धी रविवारी आमनेसामने येणार आहेत. या हायव्होल्टेज सामन्यापूर्वी पत्रकारांनी विचारलेल्या शेकहॅण्ड प्रश्नाला ‘टीम इंडिया’चा यादवने जोरदार भिरकावले. ‘मैदानावर बॅट-बॉलची लढाई होईल, बाकी गोंधळ दूर ठेवा,’ असा स्ट्रेट ड्राईव्ह त्याने लगावला.
पत्रकारांनी जेव्हा पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याबाबत प्रश्न विचारला, तेव्हा सूर्यकुमारने थेट उत्तर टाळले. तो म्हणाला, ‘इथे बॅट-बॉलची अफलातून लढत होईल, दबावाखालील सामना होईल. मी आधीच म्हटलं आहे, स्टेडियम लोकांनी फुल्ल असेल, चाहत्यांचा संपूर्ण पाठिंबा असेल. आमचं सर्वोत्तम देऊन हा सामना एन्जॉय करू.’ गटसामन्यानंतरही सूर्यकुमारने स्पष्ट केलं होतं की, हा निर्णय बीसीसीआय आणि भारत सरकारच्या सल्ल्यानंतर घेतला गेला होता.
Comments are closed.