पैसे खात्यावर घेत नाही, मी आल्यावर…, लक्ष्मण हाकेंची ऑडिओ क्लिप व्हायरल, ड्रायव्हरचा यूपीआय द

पंढरपूर : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची एक ऑडिओ क्लिप (Laxman Hake Audio Viral) सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमधील एका तरुणाने लक्ष्मण हाके (Laxman Hake Audio Viral) यांना सामाजिक कार्यात पेट्रोलसाठी आपण तुम्हाला पैसे देत असल्याचे सांगितले. यावर हाके यांनी आपल्या ड्रायव्हरचा यूपीआय नंबर दिला. हाके यांनी आपण खात्यावर पैसे घेत नसल्याचे सांगितले. यानंतर मात्र तरुणाने हाके यांना चांगलाच समज देत त्यांची लाज काढली. हाके यांच्या संदर्भातील ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे.(Laxman Hake Audio Viral)

कथित व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये काय? (Laxman Hake Audio Viral)

लक्ष्मण हाके – बोला

तरुण: तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळते, तर मग काय आम्ही विचार केला किंवा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं तुम्ही एवढा आपल्यासाठी पळत आहे

लक्ष्मण हाके – काय देताय मानधन…कुठलं गाव

तरुण – अकलूज.. तुम्हाला कधी समोर कुठे भेट झाली तर मग काय एवढं समाजासाठी पळत आहे… गाडीसाठी तेल लागतं… तर कॅश स्वरूपात द्यायचं का गुगल पे फोन पे…

लक्ष्मण हाके – धन्यवाद दादा …. भेटल्यावर द्या…

तरुण – तुमचा गुगल पे फोन पे नंबर असेल तर… त्याला यूपीआय पण आपल्याला करता येईल…

लक्ष्मण हाके – नाही राहू द्या… अकलूज परिसरात आल्यावर भेटू ..

तरुण : नाही… भेटण्यापेक्षा युपी आयवर एक लाखापर्यंत अमाऊंट जाते.. डायरेक्ट… तुम्ही कधी यायचा काय… आम्ही पण बाहेर पुण्याला असतो…

लक्ष्मण हाके – पुण्यातच आहे मी राहायला… कुठे राहता…

तरुण – कोथरूड

हाके : उद्या आहे पुण्यात सकाळी…

तरुण – ऑफिसला जाताना येतो… तुमचा युपीआय नंबर असेल तर द्या ना…

हाके – पाठवतो एक मिनिट… रितेश गुगल पे फोन पे नंबर दे…

तरुण: सांगता का मला

हाके – रितेश बाहेरवाड यांनी फोन पे नंबर सांगितला…

तरुण – सरांचा फोन पे नंबर नाही का…

हाके – ऐका ना माझा अकाउंट नाही… रितेश माझा ड्रायव्हर आहे… अकाउंटला मी पैसे घेत नाही…

तरुण – तुम्ही समाजासाठी एवढं काम करताय आपले भुजबळ साहेब पण तुम्हालाच सहकार्य करतेत … तुम्ही असं मस्तपैकी लोकांकडून पैसे घेता… सुपाऱ्या घेऊन दुसऱ्याच बोलता… लाज कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला… जनाची नाही तर मनाची… समाजाच्या विरुद्ध भडकवताय. . जरांगेंला बोलता…. सुपार्‍या घेता… जनाची नाही तर मनाची… शहाजी बापूच्या विरोधात उभारला 200 मते पडली नाहीत…. तुझी औकात नाही साल्या…. तू समाजाच्या विरोधात काम करतो…

फोन कट

आणखी वाचा

Comments are closed.