सेटवर मोठ्या बहिणीचा दर्जा, अन् पडद्यामागे शारिरीक संबंधांची मागणी; प्रसिद्ध अभिनेत्रीकडून दिग्दर्शकाबाबत धक्कादायक खुलासे

इंडस्ट्रित काम करताना कलाकाराना चांगले वाईट अनुभव येतात. यापैकी म्हत्त्वाचे म्हणजे त्यांना कास्टिंग काऊचला सामोरे जावे लागते. आत्तापर्यंत अनेक कलाकारांनी याबाबत वाचा फोडली आहे. आता पुन्हा एकदा एका साऊथ इंडस्ट्रीतल्या अभिनेत्रीने तिचा भयंकर अनुभव शेअर केला आहे.

इंडस्ट्रित किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रात काम करताना माणसं ओळखणे फार गरजेचे असते. माणसं ओळखण्यात गल्लत झाली तर त्यापुढचे अत्यंत वाईट अनुभवांना सामोरे जावे लागते. असंच काहीस या अभिनेत्रीसोबत घडलं. आपल्या भावाचा दर्जा दिलेल्या दिग्दर्शकांनी अभिनेत्रीकडे अश्लील मागणी केली. यामुळे अभिनेत्रीच्या पायाखालची जमिनंच सरकली. हा अनुभव शेअर करणारी अभिनेत्री म्हणजे चारमिला क्रिस्टीना.

चारमिला क्रिस्टीना ही साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार अभिनेत्रीपैकी एक आहे. मात्र तिलाही कास्टिंग काऊचला सामोरे जावे लागले. अभिनेत्रीने एका मुलाखतीत याबाबत सांगितलं होतं. चारमिला क्रिस्टीनाच्या म्हणण्यानुसार, तिला हा अनुभव एका मल्याळम सिनेमाच्या शुटिंगदरम्यान आला. या चित्रपटात तिने आईची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे निर्माते अभिनेत्रीपेक्षा वयाने लहान असल्यामुळे ते तिला ‘दीदी’ नावाने हाक मारायचे. त्यामुळे अभिनेत्रीने त्यांना भावाचा दर्जा दिला होता.

दरम्यान अभिनेत्रीला बहीण मानणाऱ्या या दोन दग्दर्शकांनी शुटिंगदरम्यानच तिच्याकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. यावेळी अभिनेत्रीला धक्का बसला. मात्र ती शांत बसली नाही. तिने दिग्दर्शकांना सांगितली की, मी तुमच्या आईसारखी आहे, त्यामुळे बोलताना विचार करा. मात्र त्या निर्मात्यांनी तिचं न एकता सातत्याने मागणी करत राहिले. शेवटी या सगळ्याला कंटाळून अभिनेत्री शूटिंग सोडून चेन्नईला निघून गेली.

Comments are closed.