Navratri 2025 Trending Bangles Collection: नवरात्रीसाठी ट्राय करा हे ट्रेंडिंग बांगड्यांचे कलेक्शन
नवरात्रीच्या काळात गरबा, दांडिया खेळण्याची वेगळीच मज्जा असते. यासाठी आता जोरदार तयारी सुरू झाली असेल. गरबा नाईटसाठी आऊटफिट्स आणि ज्वेलरी कोणती घालावी? हा विचार येतो. त्यासाठी तुम्ही ट्रेंडिंग बांगड्या स्टाईल करू शकता. लेहेंगा, घागरा किंवा हेव्ही ड्रेसवर बांगड्यांचे हे कलेक्शन शोभून दिसते.
कवडी घुंगरू बांगडी
या वर्षी, नवरात्रीच्या काळात, तुम्ही कोणत्याही आऊटफिटसह सुंदर कवडी आणि घुंगरूंच्या बांगड्या घालू शकता. या बांगड्या आजकाल सर्वत्र लोकप्रिय आहेत. तुम्ही या बांगड्या ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणी खरेदी करू शकता.
ऑक्सिडाइज्ड मिरर आणि घुंगरू वर्क हँड कडा
तुम्ही नवरात्रीसाठी आकर्षक ऑक्सिडाइज्ड मिरर आणि घुंगरू वर्क हँड कडा ट्राय करू शकता. या प्रकारचा कडा हेव्ही लेहेंगा आणि ड्रेसवर शोभून दिसतो.
मिरर कवडी अॅडजस्टेबल कडा
या नवरात्रीला वेगळा लूक ट्राय करायचा असेल तर तुम्ही मिरर कवडी अॅडजस्टेबल कडा वापरून पाहू शकता. या कड्यामुळे तुमचा लूक परिपूर्ण दिसेल. तुम्ही त्या ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी करू शकता.
वर्कवर्क
जर तुम्ही या नवरात्रीला एखादे खास आऊटफिट घालण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तुमच्या हातांचे सौंदर्य वाढवण्यासाठी मिरर वर्क बांगडी घालू शकता. यासह तुम्ही मिरर वर्क नेकपीस आणि इयररिंग स्टाईल करू शकता.
Comments are closed.