दुबईत रंगणार पुन्हा महासंग्राम! पाकिस्तानला पुन्हा धूळ चारायला टीम इंडिया सज्ज, किती वाजता सुरू
India vs Pakistan live Scorecard Updates Asia Cup 2025 Super 4 : भारत आणि पाकिस्तान संघ आशिया कप 2025 मध्ये पुन्हा अवघ्या एका आठवड्याच्या आत एकदा आमनेसामने येण्यासाठी सज्ज झाला आहेत. लीग स्टेजमध्ये भारताने आपल्या सर्व सामने जिंकत धमाकेदार कामगिरी केली होती, तर पाकिस्तानला एकमेव पराभव भारताकडून स्वीकारावा लागला होता.
खरंतर, गेल्या रविवारी झालेला सामना प्रचंड चर्चेत राहिला. सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्याने पाकिस्तान बिथरला आणि त्यानंतरपासून पाक संघ सतत दबावाखाली असून त्यांनी माध्यमांसमोरची पत्रकार परिषदही रद्द केली. खेळाडूंचा खचलेला आत्मविश्वास उंचावण्यासाठी पाक क्रिकेट बोर्डाने खास मोटिव्हेशनल स्पीकरला बोलावला होता. दरम्यान, भारत-पाकिस्तानच्या या हायव्होल्टेज सामन्यासाठी अँडी पाइक्रॉफ्ट पुन्हा एकदा मॅच रिफरी म्हणून काम करणार आहेत.
Comments are closed.