कर्णधार आयुष म्हात्रे फ्लॉप, वैभव सूर्यवंशीने पुन्हा घातला धुमाकूळ; 172.73 च्या स्ट्राइक रेटने

ऑस्ट्रेलिया यू 19 वि इंडिया यू 19: आयपीएल 2025 मध्ये आपल्या धडाकेबाज फलंदाजीने गाजवलेला वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा चमकला आहे. मात्र चेन्नई सुपर किंग्सचा युवा हिरो आणि टीम इंडियाचा अंडर-19 कर्णधार आयुष म्हात्रे या वेळी पूर्णपणे फ्लॉप ठरला. सध्या हे दोघेही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून, ऑस्ट्रेलिया अंडर-19 विरुद्ध इंडिया अंडर-19 यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. ब्रिस्बेनच्या इयान हीली ओवल मैदानावर पहिला सामना रंगला. भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला केवळ 225 धावांत रोखले. आता टीम इंडिया धावांचा पाठलाग करत आहे.

कर्णधार आयुष म्हात्रे (Ayush Mhatre Flop) मात्र यावेळी फ्लॉप ठरला. फक्त 10 चेंडूत 6 धावा काढून तो परतला. त्याला चार्ल्स लॅचमुंडने आऊट केले. दुसरीकडे वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi News) मैदानात पाऊल टाकताच धडाकेबाज खेळी केली. त्याने फक्त 22 चेंडूत 38 धावा फटकावल्या. त्याच्या बॅटमधून 7 चौकार आणि 1 षटकार आला. मात्र मोठी खेळी करण्यापूर्वी हेडन शिलरने त्याला बाद केले.

ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर ठरले अपयशी…

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने पूर्ण 50 षटके फलंदाजी केली आणि 9 गडी गमावून 225 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झाली. दोन्ही सलामीवीर, अ‍ॅलेक्स टर्नर आणि सायमन बज, खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. दोघांनाही भारताच्या किशन कुमारने बाद केले. परिणामी ऑस्ट्रेलियाने 34 धावांत 4 गडी गमावले.

टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सतत दबाव कायम ठेवला. 35 धावांत 4 गडी गमावल्यानंतर, कांगारूंनी काहीसे सावरले. पाचवी विकेट 90 धावांवर पडली. त्यानंतर, टॉम होगनने 41 धावा केल्या आणि आठव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या जॉन जेम्सने 71 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत ऑस्ट्रेलियाला 225 धावांपर्यंत पोहोचवले. भारताकडून हेनिल पटेलने 3, किशन कुमारने 2, कनिष्क चौहानने 2 आणि आरएस अँब्रिसने 1 विकेट घेतल्या.

आतापर्यंत, भारतीय संघाने 12 षटकांत 3 गडी गमावून 83 धावा केल्या आहेत. वैभव सूर्यवंशी 38 धावांवर, कर्णधार आयुष म्हात्रे 6 धावांवर आणि विहान मल्होत्रा ​​9 धावांवर बाद आहेत. वेदांत त्रिवेदी 20 धावांवर बाद आहे. भारताला विजयासाठी अजूनही 143 धावांची आवश्यकता आहे.

हे ही वाचा –

Ind vs Pak Asia Cup Match: आजच्या सामन्यात पाकिस्तान टीम इंडियाला नको ते करायलाच लावणार? सूर्यकुमार यादव आता काय करणार?

आणखी वाचा

Comments are closed.