Mumbai Crime News – गावी जायला पैसे दिले नाही, संतापलेल्या पतीकडून पत्नीची हत्या

गावी जायला पैसे दिले नाही म्हणून संतापलेल्या पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. कांदिवलीतील चारकोप परिसरात शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. याप्रकरणी चारकोप पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर जोडपे मूळचे ओडिशातील रहिवासी असून एका बांधकाम साईटवर मजुरीचे काम करत होते. आरोपी दसा राणा हा पत्नी हिमेंद्रीकडे गावी जाण्यासाठी पैसे मागत होता. मात्र हिमेंद्रीने नकार दिल्याने दोघा पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादातून दसाने हिमेंद्रीची गळा आवळून हत्या केली. पोलीस पुढील तपास करत आहेत.
Comments are closed.