IND vs PAK: संजू सॅमसनने उघड केले टीम इंडियाचे रहस्य, भारत-पाक सामन्याआधी सांगितला सूर्या आणि गंभीरचा प्लॅन!

भारतीय संघ आशिया कप 2025 (Asia Cup 2025) मध्ये दमदार फॉर्ममध्ये दिसत आहे. टीम इंडिया सुपर-4 मध्ये क्वालिफाय होणारी पहिली टीम ठरली होती. संघाने सामना जिंकल्यानंतर वनडे वर्ल्ड कप आणि टी20 वर्ल्ड कपसारख्याच, आशिया कपमध्येही सर्वोत्तम खेळाडूला मेडल देण्याची परंपरा सुरू आहे. यासोबतच संघात उत्साहपूर्ण वातावरणही कायम आहे. संघाचा धाकड फलंदाज संजू सॅमसनने (Sanju Samson) सुपर-4 मधील भारत-पाक सामन्याआधी प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांच्या प्लॅनबाबत मोठा खुलासा केला आहे.

भारतीय फलंदाज संजू सॅमसनने BCCI द्वारे जारी केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले की, संघात पूर्णपणे समतोल वातावरण आहे. याबद्दल संघाचे लीडर सूर्या आणि गौती भाई (हेड कोच गौतम गंभीर) यांना क्रेडिट द्यावे लागेल, कारण त्यांनी अस वातावरण तयार केल आहे जे खूप सकारात्मक आहे. संघात पूर्णपणे समतोल वातावरण आहे. प्रत्येकाला समतेने वागवले जाते आणि प्रत्येकाला समान महत्त्व दिले जाते.

सॅमसनने सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीर यांचे कौतुक करत पुढे सांगितले की, अशा वातावरणातच खेळाडू आपले सर्वोत्तम प्रदर्शन करू शकतात. म्हणूनच खेळाडू आपले सर्वोत्कृष्ट देतात आणि या फॉरमॅटसाठी हे खूप महत्वाचे आहे. या फॉरमॅटमध्ये मोकळेपणाने आणि जबाबदारीने खेळणे दोन्ही आवश्यक आहे.

संजू सॅमसनला ओमानविरुद्धच्या सामन्यात ‘प्लेयर ऑफ द मॅच’ घोषित केले गेले होते. संजूने ओमानविरुद्ध 45 चेंडूमधे 56 धावा केल्या होत्या, ज्यात 3 चौकार आणि 3 षटकार होते. या सामन्यात संजू भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. आशिया कपपूर्वी संजू भारतासाठी टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये ओपनिंग करत होता, पण शुबमन गिल (Shubman gill) टी20 संघात परत आल्यावर संजू मिडल ऑर्डरमध्ये खेळायला आला आहे.

Comments are closed.