Asia Cup: भारत-पाक सामन्यात हार्दिक पांड्या इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर! पाकिस्तानसाठी अडचण निर्माण
आशिया कप 2025 (Asia Cup 2025) मध्ये झालेल्या टी-20 स्पर्धेत आतापर्यंत अनेक रोमांचक सामने खेळले गेले आहेत. भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात 21 सप्टेंबरला सामना होणार आहे. या सामन्यात सर्वांचे लक्ष हार्दिक पांड्यावर (Hardik pandya) लक्ष असेल, जो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. हार्दिक पाकिस्तानविरुद्ध इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्याला फक्त 4 विकेट्स घ्यायच्या आहेत आणि तो टी-20 इतिहासात मोठी कामगिरी आपल्या नावावर करू शकतो. पांड्या भारताचा दुसरा सर्वात यशस्वी टी-20 गोलंदाज बनू शकतो. पांड्यापूर्वी फक्त अर्शदीप सिंगने (Arshdeep singh) ही कामगिरी केली आहे.
हार्दिक पांड्या टी-20मध्ये भारतासाठी 100 विकेट घेणारा दुसरा गोलंदाज बनू शकतो. याआधी अर्शदीप सिंगने ओमानविरुद्ध 1 विकेट घेतली होती आणि भारतासाठी टी-20 मध्ये 100 विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. आता ही कामगिरी हार्दिक पांड्या देखील करू शकतो . आतापर्यंत त्याने टी-20 मध्ये 96 विकेट घेतल्या आहेत. जर त्याने पाकिस्तानविरुद्ध 4 विकेट घेतल्या, तर तो भारतासाठी टी-20मध्ये 100 विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज ठरेल.
पाकिस्तानविरुद्ध हार्दिककडे मोठी कामगिरी करण्याची संधी आहे. हार्दिक भारतासाठी टी-20 मध्ये 100 विकेट्स घेणारा पहिला अष्टपैलू खेळाडू देखील बनू शकतो.
अर्शदीपबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 64 टी-20 सामन्यांत भारतासाठी 100 विकेट्स घेतल्या आहेत. हार्दिक पांड्याने 117 सामन्यांत आतापर्यंत 96 विकेट्स घेतल्या आहेत. पांड्याने आतापर्यंत या स्पर्धेत खेळलेल्या 3 सामन्यांत 2 विकेट्स घेतल्या आहेत. तर युजवेंद्र चहल 80 टी-20 सामन्यांत 96 विकेट्स घेतल्या आहेत, पण तो गेल्या सुमारे 2 वर्षांपासून भारतीय संघापासून दूर आहे. त्याने शेवटचा सामना 2023 मध्ये खेळला होता.
Comments are closed.