हैदराबाद विमानतळावर जप्त केलेल्या 12 कोटी रुपयांची गांजा
► सर्कल संस्था/हैदराबाद
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी हैदराबादच्या राजीव गांधी विमानतळावर दुबईहून आलेल्या एका महिला प्रवाशाकडून 12 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत अंदाजे 12 कोटी रुपये आहे. विमानतळावरील तपासणीवेळी महिला प्रवाशाकडील सामानाची झडती घेतली असता तिच्याकडे एका बॅगेत 6 किलो गांजा पॅकेट आढळले. तसेच अन्य एका बॅगमध्येही 6 किलो गांजा असल्याची कबुली महिलेने दिली. एनडीपीएस कायदा, 1985 अंतर्गत महिलेला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
Comments are closed.