आर्किटेक्चरल दोषांमुळे मुख्यमंत्र्यांनी सचिवालय सोडले

पोलीस कमांड सेंटरमधून काम : सचिवालयाच्या निर्मितीसाठी 650 कोटीचा खर्च

सर्कल संस्था/हैदराबाद

तेलंगणाचे सर्वात युवा मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी हे सध्या राज्य सचिवालयाच्या नव्या इमारतीत बसत नसल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री रेड्डी  स्वत:ची सर्व कामे बंजारा हिल्स येथील अतिसुरक्षाप्राप्त तेलंगणा पोलीस कमांड अँड कंट्रोल सेंटरमधून करत आहेत. यामागील कारण सचिवालयाच्या नव्या इमारतीतील काही वास्तुदोष असल्याचे बोलले जात आहे. 650 कोटी रुपये खर्चुन उभारलेल्या नव्या सचिवालयायच 7 मजली इमारतीत मुख्यमंत्र्यांचे भव्य कार्यालय आहे. मंत्री, मुख्य सचिवांसमवेत वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्यालये देखील तेथेच आहेत. नवी इमारत तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री अणि बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर यांच्या शासनकाळात तयार झाली होती. त्यांनी 30 एप्रिल 2023 रोजी या इमारतीचे उद्घाटन केले, परंतु डिसेंबर 2023 मधील विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव होत रेवंत रेड्डी मुख्यमंत्री झाले होते.

केसीआर यांनी वास्तूदोषामुळेच नव्या सचिवालयाची निर्मिती करविली होती. जुन्या सचिवालयाची इमारत वास्तुनुसार तयार करण्यात आली नव्हती असे त्यांचे मानणे होते. मुख्यमंत्री म्हणून स्वत:च्या दोन कार्यकाळांमध्ये ते सुमारे 24 वेळाच जुन्या सचिवालयात गेले होते. बहुतांश काम ते स्वत:चे कॅम्प ऑफिस म्हणजे प्रगती भवन येथून करत होते.

केसीआर यांनी बदलविले होते प्रवेशद्वार

नव्या सचिवालयाचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वी पूर्व दिशेने होते, परंतु ते बंद करुन दक्षिणपूर्व दिशेला करण्यात आले होते. तर केसीआर सुरुवातीपासून पूर्व दिशेनेच प्रवेश करत राहिले होते, परंतु मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी पूर्व दिशेकडून होणारा प्रवेश बंद करविला होता.

रेवंत यांना इमारतीत जाणवायची अशांतता

मुख्यमंत्री झाल्यापासून नव्या इमारतीत रेवंत यांना वारंवार अशांतता जाणवत होती, याबद्दल तपासणी केली असता वास्तूदोष असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. परंतु मुख्यमंत्र्यांनी हा कथित वास्तूदोष दूर करण्याऐवजी पोलीस नियंत्रण कक्षात बसून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. एखादा विशेष प्रतिनिधी किंवा अतिथीची भेट घ्यायची असेल तरच रे•ाr हे नव्या सचिवालयात जात असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयाकडून सांगण्यात आले.

नव्या इमारतीत केसीआर यांचे निष्ठावंत

सचिवालयात केसीआर यांचे अनेक निष्ठावंत कर्मचारी आजही आहेत. प्रारंभी रेवंत हे नव्या इमारतीत कार्यरत असताना अनेक बैठकांची माहिती उघड झाली होती. तर फोन टॅपिंग प्रकरणाने रेवंत यांचा संशय आणखी बळावला आहे. याचनंतर रेवंत रे•ाr हे पोलीस कमांड सेंटरमधून काम करत आहेत.

जुने सचिवालय पाडण्यासाठी 70 कोटीचा खर्च

नव्या सचिवालय इमारतीत स्वत:चा पुत्र के.टी. रामाराव यांना राजकीय वारस म्हणून बसविण्याचे स्वप्न केसीआर यांनी पाहिले होते. खराब अग्निसुरक्षा व्यवस्थेचा दाखला देत केसीआर यांनी जुन्या सचिवालयाला सुमारे 70 कोटी रुपये खर्च करून पाडविले होते. त्यावेळी कोरोना महामारीचा काळ होता आणि राज्य गंभीर आर्थिक संकटात होते, याचमुळे काँग्रेस समवेत अनेक विरोधी पक्षांनी याला वायफळ खर्च ठरवत विरोध केला होता.

Comments are closed.