अभिषेक शर्मा-हारिस रौफ मैदानात आमनेसामने, अंपायर वेळेत आला नाही तर झाला असता मोठा गोंधळ; व्हिडिओ व्हायरल!
Abhishek Sharma Haris Rauf: आशिया कपच्या दुसऱ्या सुपर 4 सामन्या भारत आणि पाकिस्तान भिडले. सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी 172 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर अभिषेक शर्माने भारतासाठी दमदार फलंदाजी केली.
सामन्यात, अभिषेक शर्माने डावाच्या सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. त्याने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीवर षटकार मारला. त्यानंतर, त्याने कोणत्याही गोलंदाजाला सोडले नाही आणि धमाकेदार वेगाने धावा काढल्या. हरिस रौफने भारताविरुद्ध डावाच्या पाचव्या षटकात गोलंदाजी केली. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शुबमन गिलने पुल शॉटसह चौकार मारला. पाकिस्तानी क्षेत्ररक्षकांना चेंडू पकडण्याची संधी मिळाली नाही.
यानंतर, हरिस रौफ भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माला काहीतरी म्हणत आणि त्याच्यावर ओरडताना दिसला. अभिषेक नंतर रौफला निघून जाण्याचा इशारा करतो. दरम्यान दोन्ही खेळाडू संतापलेले दिसत होेते. शुबमन गिल देखील जवळ येतो. त्यानंतर अभिषेक आणि रौफ एकमेकांसोबत शाब्दिक वाद करतात. यानंतर स्टेडियममधील चाहतेही ओरडले. अभिषेक हरिस वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल लाफडा जोकर हॅरिस रॉफ यांच्यासह. #Indvpak
अभि आणि गिल यांच्याकडे संपूर्ण पाकिस्तानी जोकर्सची मालकी आहे. pic.twitter.com/0thtcotfuh
– 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiiii_12) 21 सप्टेंबर, 2025
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माने अप्रतिम फलंदाजी केली. त्याने पाकिस्तानी गोलंदाजांना पूर्णपणे धुडकावून लावले. त्याने 39 चेंडूत 74 धावा केल्या आहेत, ज्यात 6 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश आहे. अभिषेक टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक करणारा सर्वात जलद भारतीय खेळाडू बनला आहे. त्याने फक्त 24 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. दुसरीकडे, गिल त्याला चांगली साथ देत आहे, त्याने 28 चेंडूत एकूण 47 धावा केल्या आहेत. आशाप्रकारे भारताने शेवटी 6 विकेट्सने पाकिस्तानचा पराभव केला.
Comments are closed.