बांगलादेशातील भूकंप, मेघालयातही परिणाम झाला
ढाका:
भारताचा शेजारी देश बांगलादेशमध्ये रविवारी भूकंपाचा धक्का जाणवला आहे. भारतातील मेघालयामध्येही याचा प्रभाव दिसून आला आहे. भूकंपाच्या या धक्क्यामुळे कुठल्याही प्रकारच्या हानीचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. बांगलादेशात जाणवलेल्या या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4 इतकी होती. बांगलादेशातील भूकंपानंतर याचे धक्के मेघालयातही जाणवले आहेत. बांगलादेशला लागून असलेल्या मेघालयाच्या सीमेनजीक भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 11.49 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. गुजरातच्या कच्छमध्येही रविवारी भूकंपाचा धक्का जाणवला आहे. तेथे 3.1 तीव्रतेचा भूकंप झाला. हा भूकंप दुपारी 12 वाजून 41 मिनिटांनी जाणवला होता आणि याचे केंद्र भचाऊपासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर होते. या भूकंपामुळे कुठल्याही प्रकारच्या हानीचे वृत्त अद्याप प्राप्त झालेले नाही.
Comments are closed.