हाँगकाँगमध्ये दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब सापडला

हाँगकाँग येथे बांधकामाच्या ठिकाणी दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने तयार केलेला बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर हजारो लोकांना परिसरातून बाहेर काढण्यात आले, जेणेकरून बॉम्ब निकामी करण्यात येईल. हा बॉम्ब पाच फूट लांब आणि अंदाजे 450 किलो वजनी आहे. बॉम्ब निकामी करण्याचे काम शुक्रवारी रात्री सुरू झाले ते शनिवारी सकाळपर्यंत सुरू होते.

Comments are closed.