हैदराबाद विद्यापीठात एबीव्हीपीचा मोठा विजय
एनएसयुआयला नोटापेक्षाही कमी मते
सर्कल संस्था/हैदराबाद
हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाच्या विद्यार्थी संघ निवडणुकीत संघाशी संबंधित अभाविपने मोठ्या फरकाने विजय मिळविला आहे. या निवडणुकीत अभाविपने डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटना, काँग्रेसशी संबंधित एनएसयुआयला पराभूत केले आहे. अभाविपच्या पॅनेलमधील शिवा पालेपु हे अध्यक्ष, देवेंद्र उपाध्यक्ष, श्रुती महासचिव, सौरभ शुक्ला संयुक्त सचिव, ज्वालाप्रसाद क्रीडा सचिव आणि वीनस सांस्कृतिक सचिव म्हणून निवडून आले आहेत.अभाविपने अन्य पदांवरही विजय मिळवत पूर्ण बहुमत प्राप्त केले आहे. मागील 6 वर्षांपासून या विद्यापीठात डाव्या विचारसरणी आणि एनएसयुआयचा दबदबा राहिला होता, यामुळे या विजयाला खास मानले जात आहे. हा विजय विद्यार्थ्यांचे राष्ट्रवादाला समर्थन आणि विभाजनकारी राजकारणाला नाकारण्याची कृती असल्याचे अभाविपने म्हटले आहे. सामाजिकशास्त्र यासारख्या विभागांमध्येही अभाविपला विजय मिळाला आहे, तर तेथे सर्वसाधारणपणे डाव्या विचारसरणीचा प्रभाव अधिक असतो.
डावे-एनएसयुआयचा दबदबा मोडीत
मागील 6 वर्षांपासून हैदराबाद केंद्रीय विद्यापीठात डावे, एनएसयुआयचे प्रभुत्व राहिले होते. अभाविपचा विजय विद्यार्थ्यांचा बदलता कल आणि राष्ट्रवादी विचारसरणीच्या दिशेने ओढ्याचा संकेत मानला जात आहे. काँग्रेसशी संबंधित एनएसयुआयच्या उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत. तर तेलंगणात काँग्रेसचे सरकार आहे, तरीही विद्यापीठ स्तरावर एनएसयुआयची ढिसाळ कामगिरी चर्चेचा विषय ठरली आहे.
Comments are closed.