पाकिस्तानला लोळवताच टीम इंडियाच्या कोचने भारतीय खेळाडूंना मेल धाडले; सामना संपल्यानंतर सूर्यकुम
पाकिस्तान वि पाकिस्तान सुपर 4 एशिया कप 2025: सूर्यकुमार यादव यांनी सोडलेल्या कॅचस इंडिया: आशिया कप 2025 च्या पहिल्या सुपर-4 सामन्यात भारताने धमाकेदार कामगिरी करत पाकिस्तानला 6 गडी राखून पराभूत केले. या विजयानंतर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल हे भारताचे खरे हिरो ठरले. दोघांनीही तुफानी फलंदाजी करत सामन्यावर पूर्ण पकड घेतली. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 171 धावांचे आव्हान उभे केले. मात्र भारतीय फलंदाजांनी हे लक्ष्य सहज गाठले. तर पण टीम इंडियाच्या कोचने भारतीय खेळाडूंना मेल धाडले, असे सामन्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितले.
सामना संपल्यानंतर सूर्यकुमार यादव काय म्हणाला? (What did say Suryakumar Yadav after match?)
पाकिस्तानला लोळवताच भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की, “पाकिस्तानने चांगली सुरुवात केली होती. पहिल्या 10 षटकांत त्यांनी 91 धावा केल्या, पण संघाने धीर सोडला नाही. मी ड्रिंक्स ब्रेकमध्ये खेळाडूंना सांगितले, खरी लढाई आता सुरू होते. आणि त्यानंतर ज्या पद्धतीने संघाने कामगिरी केली, त्याने मला खूप आनंद झाला आहे.”
सूर्यकुमार यादवने शिवम दुबे अन् गिल-अभिषेकचं केलं कौतुक
तो पुढे म्हणाला, “शिवम दुबे काही रोबोट नाही. त्याचाही एखादा दिवस खराब जाऊ शकतो. पण तो ज्या प्रकारे सामना फिरवतो, ते पाहून आनंद वाटतो.” गिल-अभिषेकबद्दल म्हणाला की, शुभमन आणि अभिषेक म्हणजे अगदी आग आणि बर्फ यांचा संगम आहे. ते एकमेकांना चांगली साथ देतात. लक्ष्याचा पाठलाग करताना एखाद्या फलंदाजाने 10-12 षटके टिकून राहणे गरजेचे असते, आणि त्यांनी तेच केले.”
टीम इंडियाच्या कोचने भारतीय खेळाडूंना मेल धाडले
खरंतर, खराब क्षेत्ररक्षणावर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने टोमणा मारला. पाकिस्तान विरुद्ध सामन्यात भारतीय खेळाडूंकडून तीन झेल सुटले होते. त्यावर तो म्हणाला, “क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांनी झेल सोडणाऱ्या प्रत्येक खेळाडूला मेल पाठवला आहे. चुका नक्कीच सुधारल्या जातील.”
सोमवारी सकाळी आणि ईमेल 😬 📩
पुढच्या वेळी मुलं चांगले पकडतात 💙🤭
पहा #Dpworldasiacup2025सप्टेंबर 9-28, संध्याकाळी 7 नंतर, सोनी स्पोर्ट्स नेटवर्क टीव्ही चॅनेल आणि सोनी लिव्हवर थेट.#Sonsportsnetwork #Indvpak pic.twitter.com/ffmljtjifz
– सोनी स्पोर्ट्स नेटवर्क (@sonsportsnetwk) 22 सप्टेंबर, 2025
सामन्याबद्दल बोलायचं झाले तर, रविवारी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या आशिया कप 2025 च्या सुपर फोर सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 चेंडू बाकी असताना 6 विकेट्सने पराभव केला. सध्या सुरू असलेल्या आशिया कप 2025 स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर हा दुसरा विजय होता. भारताने 18.5 षटकांत 4 विकेट्स गमावून 174 धावा करून 172 धावांचे लक्ष्य गाठले.
अभिषेक शर्मा आणि गिल यांनी भारतीय संघाला शानदार आणि वेगवान सुरुवात दिली. या दोघांनी 9.5 षटकांत पहिल्या विकेटसाठी 105 धावा जोडल्या. 28 चेंडूंत 47 धावा काढल्यानंतर गिल बाद झाला. कर्णधार सूर्यकुमार यादव काही खास करू शकला नाही, तो 3 चेंडूंत खाते न काढता बाद झाला. अभिषेक शर्माने शानदार अर्धशतक झळकावले, 39 चेंडूंत 5 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 74 धावा केल्या. अभिषेकच्या खेळीमुळे भारताचा विजय सोपा झाला. शेवटी तिलक वर्मा 30 धावांवर आणि हार्दिक 7 धावांवर नाबाद राहिले.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.