CPL 2025: पोलार्डच्या टीमचा ऐतिहासिक पराक्रम, पाचव्यांदा विजेतेपद पटकावून जगातील चौथी टीम ठरली

CPL 2025 Final: वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू कायरन पोलार्डच्या संघाने कॅरिबियन प्रीमियर लीग म्हणजेच CPL 2025 मध्ये चमत्कार केले. ट्रिनबागो नाईट रायडर्सने CPL 2025 चे विजेतेपद जिंकून नवा इतिहास रचला आहे. गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात, निकोलस पूरनच्या नेतृत्वाखालील ट्रिनबागो नाईट रायडर्सने गयाना अमेझॉन वॉरियर्सचा पराभव करून पाचव्यांदा CPL विजेतेपद जिंकले. याआधी, ट्रिनबागो नाईट रायडर्स संघ 2015, 2017, 2018, 2020 आणि 2023 मध्ये देखील चॅम्पियन बनला होता. ट्रिनबागो नाईट रायडर्स हा CPL मध्ये सर्वाधिक विजेतेपद जिंकणारा संघ आहे.

सर्वाधिक सीपीएल CPL विजेतेपदे जिंकणारे संघ:

ट्रिनबागो नाईट रायडर्स – 5
जमैका तल्लवा – 3
बार्बाडोस रॉयल्स – 2
गयाना अमेझॉन वॉरियर्स – 1
सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्स – 1
सेंट लुसिया किंग्ज – 1

ट्रिनबागो नाईट रायडर्स हा टी20 लीग क्रिकेट इतिहासात पाच विजेतेपदे जिंकणारा जगातील चौथा संघ आहे. यापूर्वी, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि पर्थ स्कॉर्चर्स यांनी आयपीएलमध्ये पाच विजेतेपदे जिंकली आहेत.

अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना, गयाना अमेझॉन वॉरियर्सने 20 षटकांत आठ गडी गमावून फक्त 130 धावा केल्या. ज्यामध्ये इफ्तिखार अहमदने संघाकडून सर्वाधिक 30 धावा केल्या. बेन मॅकडर्मॉटने 28, तर प्रिटोरियसने 25 धावा केल्या. त्रिनबागोकडून सौरभ नेत्रावलकरने सर्वाधिक 3 बळी घेतले. अकिल हुसेनने 2 बळी घेतले. आंद्रे रसेल आणि उस्मान तारिक यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

131 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, ट्रिनबागो नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी चांगला खेळ केला. संघाने 2 षटके शिल्लक असताना 7 विकेट गमावून सामना जिंकला आणि जेतेपदावर कब्जा केला. सलामीवीर अ‍ॅलेक्स हेल्सने 26 आणि कॉलिन मुनरोने 23 धावा केल्या. शिवाय सुनील नारायणने 22 तर पोलार्डने 21 धावा केल्या.

Comments are closed.