मनोज जरांगे स्वत: बिळात लपतो, इतरांना हल्ले करायला लावतो, मराठा तरुणांनाही फसवलं: नवनाथ वाघमारे
नवनाथ वाघमेरे आणि मनोज जरेंग पाटील: ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांची स्कॉर्पिओ गाडी रविवारी एका अज्ञात व्यक्तीने पेटविल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. जालना शहरातल्या नीलम नगर भागात रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास ही घटना घडली होती. त्यांच्या गाडीवर एका अज्ञात व्यक्तीने ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावून दिली. या सगळ्यानंतर नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. मनोज जरांगे यांच्या अवतीभोवतीच्या लोकांनीच माझी गाडी जाळली. जरांगेंची औकात असेल तर त्याने स्वत: रस्त्यावर यावं, असे आवाहन नवनाथ वाघमारे यांनी दिले. ते सोमवारी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मनोज जरांगे दुसऱ्याला समोर करुन चुकीचं कृत्य करतो. यापूर्वी त्याने मराठा तरुणांना असेच फसवले आहे. त्यांना हल्ले करायला लावून मनोज जरांगे स्वत: अंतरवलीच्या बिळात जाऊन लपतो. आम्ही खरं बोलतो म्हणून यांच्या बुडाला आग लागते. मी, शरद पवार, रोहित पवार राजेश टोपे या सर्व नेत्यांवरती मी बोलल्यामुळे यांच्या बुडाला आग लागली. जरांगेने जास्त माज दाखवला तर आम्ही जरांगेच्या गाड्या अडवू, जरांगेंच्या घरावर जायला सुद्धा आमची पोरं घाबरणार नाहीत, असा इशारा नवनाथ वाघमारे यांनी दिला.
Gunaratna Sadavarte: गोपीचंद पडळकर हे औरंगजेब,गुणरत्न सदावर्ते हे शाहिस्तेखान आणि लक्ष्मण हाके हे आधुनिक विचाराचे अफजलखान; सचिन खरातांची टीका
गोपीचंद पडळकर ज्या जिल्ह्यातून येतात त्याच रहिवाशी आहे. सांगली जिल्ह्याला संस्कृत वारसा आहे. मात्र गोपीचंद पडळकर यांचा वारसा चेक करण्याची गरज आहे. पडळकर यांना थोर पुरुषांची नाव घेण्याचा अधिकार नाही. त्यांची आमदारकी रद्द करून भाजप पक्षाने हकालपट्टी करावी. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना साथ देत आहेत. लक्ष्मण हाके नाभिक समाजाला एससी मध्ये घ्यावे अशी मागणी करत आहेत हे होऊ शकते का? हे कदापी होऊ शकत नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ज्या समाजाने केस कापले नाहीत. त्यांना एससी मधून आरक्षण मागण्याचा अधिकार नाही. लक्ष्मण हाके यांनी एससी आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे हात उपसून काढू, असा इशारा सचिन खरात यांनी दिला आहे. गुणरत्न सदावर्ते हे आंबेडकरी विचाराचे नाहीत. तो आरएसएसचा हस्तक आहे. समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी विधाने ते करतात. सदावर्तेंचा हा पब्लिसिटी स्टंट आहे. गोपीचंद पडळकर हे औरंगजेब, गुणरत्न सदावर्ते हे शाहिस्तेखान आणि लक्ष्मण हाके हे आधुनिक विचाराचे अफजलखान आहेत, त्यांनी आमच्या नादी लागू नये,असे सचिन खरात यांनी म्हटले.
https://www.youtube.com/watch?v=fqipkqojyqg
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.