मराठवाड्यावर अस्मानी संकट, ढगसदृश्य पावसामुळे अनेक जिल्ह्यांत जनजीवन विस्कळीत

मराठवाड्यातील अनेक जिल्हात ढगसदृश्य पाऊस पडला आहे. अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे तर अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थित निर्माण झाली आहे.

धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले असून पावसामुळे छोटे-मोठे तलाव फुटले आहेत. परंडा तालुक्यातील लाखी, भूम तालुक्यातील अंतरगाव, चिंचपूर ढगे, हिवरडा, वालवड परिसरामध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. चिंचोली गावामध्ये पुराच्या पाण्याने एका वृद्ध महिलेचा झोपलेल्या ठिकाणी मृत्यू झाल्याची देखील घटना घडली आहे.या ढगफुटी सदृश्य पावसामुळे या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आहे. तसेच नदीपात्राच्या जवळील अनेक गावे जलमय झाली आहेत.  धाराशिव मध्ये हेलिकॉप्टरच्या मदतीने लोकांना वाचवले जात असून जालन्यात मध्यवर्ती बसस्थानका शेजारील पूस दुसऱ्यांना पाण्याखाली गेला आहे.

Comments are closed.