अहिल्यानगरमध्ये मुसळधार पाऊस, घर कोसळून तीन जण जखमी

अहिल्यानगरमधील जामखेड परिसरात गेल्या पाच दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. विशेषतः नदीकाठच्या लोकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. पिके पाण्यात गेलेली आहेत त्यामुळे तालुक्यातील नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत अशी मागणी होत आहे. यातच सावरगाव येथे पावसामुळे एक घर पडले असून घरात झोपलेले तीन जन जखमी झाले आहेत यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.
जामखेड तालुक्यातील सावरगाव येथे गौतम बाबासाहेब गोरे हे रात्री आपल्या घरात कुटुंबासमवेत झोपलेले असताना रात्री साडेचार वाजता घर कोसळले. त्यात स्वत: गोरे, त्यांच्या पत्नी आणि मुलगा
असे तीनजण जखमी झाले आहेत. गौतम गौरे यांना जास्त लागलं असून ते गंभीर जखमी झाले आहेत.
घर कोसळले तेव्हा मोठा आवाज झाला. हे ऐकून ताबडतोब आसपासचे लोक जमा झाले त्यांनी ताबडतोब जखमींना ढिगाऱ्याबाहेर काढले आणि नगरला उपचारासाठी पाठवले.
शहरातील नागेश्वर मंदिरात जाण्यासाठी धाकटी नदीवर लोखंडी पुल रात्रीच्या पावसामुळे खचला आहे. उदघाटनाच्या आधीच पुल खचल्यामुळे कामाच्या दर्जाबाबत शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक ठिकाणी लाइटचे पोल पडलेले आहेत.
Comments are closed.