Health Tips: मायग्रेनचा त्रास वाढलाय? हे 5 पदार्थ ठरतील लाभदायक
मायग्रेनचा त्रास वाढला की तीव्र डोकेदुखी जाणवते. सामान्य डोकेदुखीचा त्रास हा काही वेळाने कमी होतो पण मायग्रेनमुळे डोके दुखत असेल तर अनेक दिवस त्रास जाणवतो. अशा वेळी उलट्या आणि मळमळ यासारख्या समस्या देखील होतात. यावर उपाय म्हणून अनेकदा औषधे घेतली जातात तरीही आराम मिळत नाही. अशा स्थितीत औषधांसोबतच तुम्ही आहारात योग्य पदार्थांचा समावेश केल्यास मायग्रेनचा त्रास कमी होऊ शकतो. मायग्रेनच्या त्रासावर कायमस्वरूपी उपचार नाहीत. मात्र औषधे, योग्य जीवनशैली आणि पौष्टिक आहाराने तुम्ही डोकेदुखीपासून आराम मिळवू शकता.
आले
आले हा डोकेदुखीवर प्रभावी उपाय आहे. यामुळे मळमळ आणि उलट्यांचा त्रास देखील कमी होतो. तीव्र डोकेदुखी किंवा मळमळ जाणवल्यास एक कप आल्याचा चहा घेतल्याने आराम मिळेल.
जवस
जवस देखील मायग्रेनच्या वेदना कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. जवसमध्ये मॅग्नेशियम आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतात, जे डोकेदुखी कमी करण्यास मदत करतात. तुमच्या आहारात ओमेगा-३ फॅटी अॅसिड समृद्ध असलेले पदार्थ समाविष्ट केल्याने मायग्रेनच्या त्रास कमी होतो.
हळद
झोपण्यापूर्वी तुम्ही एक कप हळदीचे दूध पिणे फायदेशीर ठरते. यामुळे चांगली झोप तर येतेच शिवाय मायग्रेनचा त्रास कमी होतो.
काकडी
बहुतेक लोक त्यांच्या आहारात काकडी घेतात. काकडीमुळे मायग्रेनच्या वेदनांपासून आराम मिळतो.
Comments are closed.