Mumbai News – पुजेच्या बहाण्याने बोलावून तरुणीचा विनयभंग, गुन्हा उघडकीस येताच पुजाऱ्याने जीवन संपवलं

मुंबईतील कांदिवली परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुजेच्या बहाण्याने बोलावून पुजाऱ्यानेच तरुणीचा विनयभंग केला. कांदिवली पश्चिमेकडील लालजीपाडा येथे ही घटना घडली. घटना उघडकीस येताच बदनामीच्या भीतीने पुजाऱ्याने जीवन संपवलं आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कांदिवली पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पुजारी हा लालजीपाडा येथील तारकेश्वर मंदिरात गेल्या पाच वर्षांपासून पूजा पाठ करत आहे. पीडिताही या मंदिरात नियमित दर्शनासाठी येत असे. पुजाऱ्याने पीडितेला पूजा करण्याच्या बहाण्याने घरी बोलावले आणि तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली.

पीडितेने आपल्या पालकांना ही बाब सांगितली. यानंतर पीडितेच्या पालकांनी पुजाऱ्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी कांदिवली पोलीस ठाणे गाठले. पोलिसात गुन्हा दाखल होत असल्याची आणि बदनामीच्या भीतीने पुजाऱ्याने मंदिरातच गळफास घेत आत्महत्या केली. राजेश गोस्वामी असे आत्महत्या पुजाऱ्याचे नाव असून तो मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील रहिवासी आहे.

कांदिवली पोलिसांनी एडीआर दाखल करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पुजाऱ्याने याआधीही तरुणींचा विनयभंग केला आहे का? याबाबत कांदिवली पोलीस तपास करत आहेत.

Comments are closed.