IND vs PAK: हारिस रऊफच्या मैदानावरील लाजिरवाण्या कृतीवर ICC करणार कारवाई? जाणून घ्या सविस्तर!

सुपर 4 मध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी करत 6 विकेट्सने मोठी विजय मिळवली. सामन्याच्या पहिल्या बॉलपासूनच पाकिस्तानी खेळाडू हद्दपार होऊन वागत होते. सामन्यात हारिस रऊफने (Haris Rauf) भारतीय चाहत्यांकडे वारंवार हातांनी 6-0 असा इशारा केला. चाहत्यांनी त्याला प्रतिसाद दिल्यावर त्याने फाइटर जेट खाली आणण्याचा इशारा देखील हातांनी केला. यावर आता ICC मोठी एक्शन घेऊ शकते.

जेंव्हा पाकिस्तानची टीम सामन्यात आघाडी घेऊ लागली, तेव्हा हारिस रऊफ मैदानावर भारतीय खेळाडूंना चॅलेंज करत होता. बाउंड्रीवर फील्डिंग करताना चाहत्यांनी त्याला ‘विराट- विराट’ असे चिढवले. त्यावर रऊफने आधी 6-0 इशारा सुरू केला आणि नंतर फाइटर जेट खाली आणण्याचा इशारा केला. चाहत्यांचा असा विश्वास आहे की, त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या वेळी भारताचे 6 फाइटर जेट्स खाली आणले होते, त्यामुळे रऊफ वारंवार 6-0 असा इशारा करत होता. या दरम्यान चाहत्यांनी 2022 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीच्या (Virat Kohli) दोन षटकारांची आठवण रऊफला करून दिली. आता आयसीसी हारिस रऊफवर मोठी कारवाई करू शकते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलच्या (ACC) नियमांनुसार, खेळाडू कोणताही वैयक्तिक संदेश दाखवू शकत नाहीत, विशेषतः जर तो राजकारण, धर्म, रंग किंवा जातीशी संबंधित असेल. याच कारणाने मोईन अली आणि उस्मान ख्वाजा यांच्यावर ICC ने कारवाई केली होती. 2019 मध्ये महेंद्रसिंग धोनीला बलिदान बॅज घालून खेळण्यास मनाई करण्यात आली होती.

या नियमांनुसार हारिस रऊफवर ICC कारवाई करू शकते. त्याला 1 डिमेरिट पॉइंट देण्यासोबत सामन्याच्या पगाराचा 50% दंडही लागू केला जाऊ शकतो. चाहत्यांमध्ये आता ICC च्या या निर्णयाची उत्सुकता आहे.

Comments are closed.