चोरट्याचा पाठलाग करताना फॉरेन्सिक व्हॅनचालक जखमी

लोकल प्रवासात चोरटय़ाने मोबाईल खेचून नेताना ट्रकमध्ये पडल्यामुळे मध्य प्रादेशिक विभागाच्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचालक जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी वडाळा रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

ऋषिकेश चितळकर हे मध्य प्रादेशिक विभागाच्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन येथे चालक म्हणून काम करतात. दोन दिवसांपूर्वी त्यांना सुट्टी असल्याने खरेदीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जात होते. रात्री त्यांनी कॉटनग्रीन येथून लोकल पकडली. लोकल रे रोड स्थानकात थांबली. त्यानंतर त्यांनी फोन हातात धरला. लोकल सुरू असतानाच अज्ञात चोरटय़ाने त्यांचा फोन खेचून नेण्याचा प्रयत्न केला. त्याचदरम्यान फलाट क्रमांक 2 येथे लोकलमधून ते जखमी झाले. याप्रकरणी वडाळा रेल्वे पोलिसांनी अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा नोंद केला.

Comments are closed.