शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश; प्रभादेवीतील पादचारी पूल नागरिकांसाठी खुला, घटस्थापनेच्या मुहूर्तावर उद्घाटन

एलफिन्स्टन पूल वाहतुकीला बंद केल्यामुळे पादचारी, नागरिकांच्या झालेल्या गैरसोईच्या मुद्दय़ावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेताच प्रशासनाने प्रभादेवी रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाच्या कामाला गती दिली. शिवसेनेने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन अखेर सोमवारी घटस्थापनेच्या मुहूर्तावर प्रभादेवीचा पादचारी पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला.

एलफिन्स्टन पुलाला पर्यायी पादचारी पूल उभारण्यासाठी शिवसेनेने आग्रही मागणी केली होती. शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांनी त्यासाठी दहा वर्षे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नामुळे व आमदार अजय चौधरी यांच्या सहकार्याने अखेर हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला.  प्रभादेवी रेल्वे स्थानक आणि मध्य रेल्वेच्या रेल्वे मार्गिकांवरून जाणाऱ्या पादचारी पुलामुळे स्थानिक नागरिक, रेल्वे प्रवासी, विद्यार्थ्यांना पूर्व आणि पश्चिम परिसरात ये-जा करणे सोयीचे होणार आहे. एलफिन्स्टन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यानंतर अरविंद सावंत आणि अजय चौधरी यांनी सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणांना जाब विचारला होता. तसेच नवरात्रोत्सवापूर्वी पादचारी पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा इशारा दिला होता. यावेळी अरविंद सावंत, अजय चौधरी, आमदार महेश सावंत, शाखाप्रमुख मिनार नाटळकर, विजय भणगे तसेच भारतीय कामगार सेनेचे चिटणीस अरुण तोरस्कर, प्रमोद सिंग, प्रथमेश जगताप तसेच रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.

Comments are closed.