छत्तीसगडच्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले

वृत्तसंस्था/ रायपूर

छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात सोमवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या संघर्षात एका कमांडरसह दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. सुरक्षा दलांनी कारवाईदरम्यान दोघांचेही मृतदेह आणि त्याच्याकडील शस्त्रास्त्रे जप्त केली. सदर दोन्ही नक्षलवाद्यांवर प्रत्येकी 40-40 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमावर्ती भागातील अबुझमद भागात नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरू केलेल्या शोध मोहिमेदरम्यान ही चकमक सुरू झाली. सायंकाळी उशिरापर्यंत या भागात गोळीबार सुरू होता. चकमकीच्या ठिकाणी शोधमोहीम सुरू असल्याने ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतरच सविस्तर माहिती जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Comments are closed.