वयाच्या ४० नंतरही राहाल फीट, बदला या सवयी
वयानुसार शरीरात अनेक बदल होतात. विशेषकरून वयाच्या ४० नंतर हे बदल तीव्रतेने जाणवतात. कारण वय जसे वाढते तसे पचनशक्ती मंदावते, स्नायु कमकुवत होतात. हाडे ठिसूळ होतात. स्मरणशक्तीवरही परिणाम होतो. या सर्व बदलांचा शरीरावरही परिणाम होतो. त्यामुळे वजन वाढू लागते, एकाग्रतेवरही परिणाम होतो. परिणामी या सर्व बदलांमुळे अनेक व्याधी याच वयात मागे लागतात. पण योग्य खबरदारी घेतल्यास भविष्यात होणाऱ्या या व्याधी टाळता येऊ शकतात.
त्यासाठी कार्डीयो एक्सरसाईज, वेगाने चालणे, जॉगिंग,सायकलिंग. स्वीमिंग, मेडीटेशन करावे. त्यामुळे हृदय आणि फुफ्फुस निरोगी राहते. वजन नियंत्रणात राहते. तसेच सध्या कार्डियो आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगचा ट्रेंड आहे. त्यामुळे आठवड्यातून २ ते ३ वेळा २० ते ३० मिनिट कार्डियो आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्याने शरीराला नक्कीच फायदा होईल.
कार्डियो आणि स्ट्रेंथ केल्याने शरीरात रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होते. त्यामुळे मेंदूला ऑक्सिजनचा योग्यरितीने पुरवठा होतो. मेंदू सक्रीय राहण्यास मदत होते. त्यामुळे स्मृतीभ्रंश सारखे विकार होत नाहीत. एकाग्रता वाढते, ताण -तणाव निवळतो.
मात्र या सर्व एक्सरसाईज करतेवेळी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. मुबलक प्रमाणात पाणी प्यावे. तास तास एक्सरसाईज न करता डॉक्टरांच्या सल्ला घ्यावा. गरज पडल्यास जीम ट्रेनरची मदत घ्यावी.
Comments are closed.