पुढील महिन्यात बिहार निवडणुकीची घोषणा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बिहारची विधानसभा निवडणूक येत्या नोव्हेंबर महिन्यात होणार असून या निवडणुकीची अधिसूचना ऑक्टोबरच्या प्रारंभी काढण्यात येणार आहे, अशी घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. या आठवड्यात निवडणूक आयोग बिहारच्या दौऱ्यावर जाणार असून तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. तसेच निवडणुकीच्या सज्जतेचाही आढावा घेणार आहे. सर्व सज्जतेचा आढावा घेतल्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आणि कार्यक्रम घोषित केला जाईल. ही निवडणूक चार टप्प्यांमध्ये घेतली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महागठबंधन यांच्यात चुरस लागणार आहे.
Comments are closed.