Beed News – नद्यांना महापूर, दळणवळण ठप्प, बीड जिल्ह्यातील 500 गावांचा संपर्क तुटला

बीड जिल्ह्यात सोमवारी (२२ सप्टेंबर) रात्री उशिरा पर्यंत पावसाची संततधार सुरूच होती. बंधारे तुडुंब भरल्याने प्रकल्प साठ्यात मोठी आवक सुरू आहे. सर्वच धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. माजलगाव प्रकल्पाचे अकरा, मांजराचे सात, अप्पर कुंडलीकाचे तीन दरवाजे उघडे आहेत. बीडमध्ये जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. आजचा दिवस धोक्याचा असून सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पाचव्यांदा बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झाले असून, अनेक नद्यांना उधाण आले आहे. जिल्ह्यात असंख्य पुल पाण्याखाली आहेत. तसेच अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यातील जवळपास पाचशे गावांचा संपर्क तुटला असून, दळणवळण ठप्प झाले आहे.

पूर ओसरल्यावरच वाहतूक सुरू होईल असा अंदाज आहे. सिंदफणा नदीच्या पुरामुळे वीस गावं प्रभावित झाली आहेत. तसेच माजलगाव तालुक्यातील सात गावांना सध्या पुराच्या पाण्याने वेढले आहे. काही ठिकाणी रस्ता खचला तर पुल वाहून गेले आहेत.

Comments are closed.