आधी हारिस रौफने मैदानात नको नको ते केलं; आता पत्नी मुझनाच्या वादग्रस्त पोस्टने खळबळ, म्हणाली…


हॅरिस राउफ पत्नी पोस्ट इंड. पाक एशिया कप 2025: आशिया चषक 2025 च्या स्पर्धेतील (Asia Cup 2025) सुपर-4 मध्ये भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात 21 सप्टेंबर रोजी सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने 6 विकेट्स पाकिस्तानचा पराभव केला. आशिया चषकाच्या या स्पर्धेत भारताने सलग दुसऱ्यांदा पाकिस्तानला लोळवलं. भारताविरुद्धचा हा पराभव पाकिस्तानला चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसून येतंयं. पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ (Haris Rauf ) याची पत्नी मुझना मसूद मलिकने सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट (Haris Rauf Wife Shameless Post On Instagram) केली आहे.

भारतविरुद्धच्या सामन्यात हारिस रौफ भारतीय फलंदाजांना वारंवार चिथवण्याचा प्रयत्न करत होता. तसेच दुसऱ्या डावात म्हणजेच भारत जेव्हा फलंदाजी करत होता, त्यादरम्यानचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ मैदानात फलंदाजी करत असताना मैदानातील प्रेक्षकांना हाताने एअरक्राफ्ट पाडल्याची अॅक्शन करुन दाखवत आहे. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या रौफला स्टेडियममधील भारतीय चाहत्यांनी थेट त्याची जागा दाखवून दिली. त्यांनी त्याला विराट कोहलीची आठवण करून दिली. रौफची ॲक्शन पाहताच चाहत्यांनी थेट कोहली, कोहली…असे जयघोष करायला सुरुवात केली. यानंतर रौफ आणखीच चवतळल्याचे दिसून आले. मात्र या वादात आता हारिस रौफच्या पत्नीने उडी घेतली आहे.


हारिस रौफची पत्नी पोस्टद्वारे नेमकं काय म्हणाली? (Haris Rauf Wife Post On Instagram)

हारिस रौफची पत्नी मुझना मसूद मलिकने इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. या पोस्टद्वारे आम्ही सामना हरलो, पण आम्ही युद्ध जिंकले…असं मुझना मसूद मलिकने म्हटलं आहे.

भारताचा 6 विकेट्सने दणदणीत विजय- (Team India Win Over Pakistan)

आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान दुसऱ्यांदा आमने सामने आले आहेत. साहिबजादा फरहान यानं 58 धावा केल्या.भारताच्या फिरकी गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारु दिली नाही. सॅम अयूब 21 धावा, मोहम्मद नवाझ 21 आणि फहीम शरीफनं 20 धावा करत पाकिस्तानला 171 धावांपर्यंत पोहोचवलं. यानंतर भारतानं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. अभिषेक शर्माच्या 74 धावा, शुभमन गिल 47 धावा यामुळं भारताचा विजय सोपा झाला. या दोघांच्यानंतर तिलक वर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या यांनी भारताला विजयापर्यंत पोहोचवलं. तिलक वर्मानं 30 धावा करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारतानं पाकिस्तानला 6 विकेटनं पराभूत केलं.

संबंधित बातमी:

Sahibzada Farhan Gun Celebration Ind vs Pak Asia Cup 2025: गोळीबाराची ॲक्शन करत सेलिब्रेशन करणाऱ्या साहिबजादा फरहानची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, अचानक…

Ind vs Pak Asia Cup 2025: चल जा भोसxx..अभिषेक अन् शुभमन दोघेही नडले; शाहीन, हारीसला बोल बोल बोलले, VIDEO

आणखी वाचा

Comments are closed.