साहिबजादाचं गोळीबार करत सेलिब्रेशन; अभिषेक शर्मानेही ‘L’ दाखवले, आता स्वत:ने अर्थही सांगितला!


अभिषेक शर्मा इंड वि पाक एशिया कप 2025: आशिया चषक 2025 च्या स्पर्धेतील (Asia Cup 2025) सुपर-4 मध्ये भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात 21 सप्टेंबर रोजी सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने 6 विकेट्स पाकिस्तानचा पराभव केला. भारताकडून सलामीवीर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आणि शुभमन गिल (Shubhman Gill) यांनी आक्रमक सुरुवात केली होती. अभिषेक शर्माने 39 चेंडूत 74 धावा केल्या. पाकिस्तानच्या गोलंदाजांना अभिषेक शर्माने धू धू धुतलं.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतर अभिषेक शर्माने हाताच्या बोटाद्वारे एल टाईपचा आकार दाखवत सेलिब्रेशन (Abhishek Sharma Celebration) केले होते. यानंतर अभिषेक शर्माने केलेल्या या एलचा नेमका अर्थ काय, याची चर्चा रंगली होती. आता स्वत: अभिषेक शर्मानेच याबाबत खुलासा केला आहे. सूर्यकुमार यादवने या एलचा अर्थ काय असा प्रश्न विचारला. यावर L म्हणजे प्रेम. हा L भारतीय संघावर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी आहे. हे सेलिब्रेशन भारतीय चाहत्यांसाठी आहे, असं अभिषेक शर्माने सांगितले.

विवादित उत्सव-फरहान उत्सव-फरहान उत्सव

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्या पहिल्या डावात पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज साहिबजादा फरहानने (Sahibzada Farhan) अर्धशतक झळकावताच बॅटनं AK 47 प्रमाणं गोळीबाराची ॲक्शन करत सेलिब्रेशन केलं. साहिबजादा फरहानचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. सदर प्रकरणानंतर सोशल मीडियावर साहिबजादा फरहानला चांगलेच ट्रोल करण्यात आले. तसेच साहिबजादा फरहानवर आयसीसीने कारवाई करावी, अशी मागणी देखील भारतीयांकडून करण्यात आली.

अभिषेक शर्माची आक्रमक फलंदाजी- (Abhishek Sharma Batting)

172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा सलामीला मैदानात उतरले. अभिषेकने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत दमदार सुरुवात केली. चारही बाजूंनी चौकार-षटकारांचा वर्षाव होत होता. नवव्या षटकातच भारताने शतक गाठलं. अभिषेक शर्मानं फक्त 24 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात अभिषेक शर्माने 39 चेंडूत 74 धावा केल्या. यामध्ये 5 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश आहे.

संबंधित बातमी:

Haris Rauf Wife Post Ind vs Pak Asia Cup 2025: आधी हारिस रौफने मैदानात नको नको ते केलं; आता पत्नी मुझनाच्या वादग्रस्त पोस्टने खळबळ, म्हणाली…

Sahibzada Farhan Gun Celebration Ind vs Pak Asia Cup 2025: गोळीबाराची ॲक्शन करत सेलिब्रेशन करणाऱ्या साहिबजादा फरहानची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, अचानक…

आणखी वाचा

Comments are closed.