बारामतीत जुन्या भांडणाच्या कारणातून पाच जणांवर कोयत्याने वार; देवीची ज्योत आणली, पूजा सुरू असत
बारामती: बारामती तालुक्यातील वंजारवाडीमध्ये जुन्या भांडणाच्या कारणातून पाच जणांवर कोयत्याने वार (Baramati Crime News) झाले आहेत. घटस्थापनेदिवशी रात्री साडे आठच्या सुमारास वंजारवाडी येथील दत्त मंदिर समोर ही घटना घडली आहे. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात अमोल अण्णा चौधरी याच्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋतिक उर्फ गुड्या मुळिक, ओम अर्जुन कुचेकर,अली मुजावर, दिपक भोलनकर आणि शुभम वाघ यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेनंतर शुभम वाघ,अली मुजावर आणि ओम अर्जुन कुचेकर या तिघांना बारामती तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर या हल्ल्यामध्ये सुनिल चौधर,अमोल चौधर, भारत चौधर, सागर चौधर आणि आदित्य चौधर हे पाच जण जखमी झाले आहेत.(Baramati Crime News)
Baramati Crime News: साडेआठ वाजण्याच्या सुमारास चारचाकी…
पोलिसात दिलेल्या तक्रारी नुसार,सोमवारी 22 सप्टेंबर रोजी फिर्यादी अमोल आण्णा चौधर, भारत गोकुळ चौधर, सागर चंद्रकांत चौधर, आदित्य सर्जेराव चौधर, सुनिल गोरख चौधर हे सर्व व इतर नवरात्र उत्सव चालू असल्याने देवीची ज्योत राशीन येथून मौजे वंजारवाडी येथे दत्त मंदिरासमोर घेऊन आले. मंदिरासमोर पुजा पाठ करून पारंपारिक वाद्यावर उत्सव साजरा करीत होते. त्याचवेळी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एक चारचाकी त्या ठिकाणी आली.
Baramati Crime News: हातात लोखंडे कोयते आणि चाकू अशा पद्धतीची हत्यारे
त्यातून मधुन ऋतिक उर्फ गुड्या मुळिक, ओम कुचेकर, अली मुजावर ,दिपक भोलनकर आणि शुभम वाघ व त्यांचेसोबत असणारे दोन ते तीन अनोळखी इसम होते. त्यांच्या हातात लोखंडे कोयते आणि चाकू अशा पद्धतीची हत्यारे होती. आणि त्यानंतर या व्यक्तींनी दत्त मंदिरासमोर उभा असणाऱ्या फिर्यादी यासह त्यांच्या बंधुंवर हल्ला चढवला यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले. यानंतर बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिकचा तपास करत आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.