सार्वजनिक टॉयलेट सीटवर बसावं की नाही? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात प्रवासात, शॉपिंग मॉल्समध्ये, रेल्वे स्टेशनवर किंवा बसस्थानकांवर सार्वजनिक शौचालयांचा वापर टाळणं अनेक वेळा शक्य होत नाही. मात्र अशा वेळी मनात नेहमीच एक प्रश्न येतो  सार्वजनिक टॉयलेट सीटवर बसणं खरंच सुरक्षित आहे का? अनेकांचा समज असतो की टॉयलेट सीटवर बसल्यानं थेट आजार होतात. पण प्रत्यक्षात धोका थोडा वेगळा आहे. चला तर मग पाहूया सार्वजनिक टॉयलेटमध्ये काय धोके असतात आणि स्वतःला कसं सुरक्षित ठेवता येईल. (is public toilet seat safe tips in marathi)

सार्वजनिक टॉयलेटमधील जंतू

दररोज हजारो लोक या शौचालयांचा वापर करतात. त्यामुळे टॉयलेट सीट, दाराचे हँडल्स, नळाचे हँडल्स आणि फ्लश लीव्हरवर अनेक प्रकारचे जीवाणू आणि व्हायरस आढळतात. ई-कोलाई, एंटरोकोकस, क्लेबसिएला हे जीवाणू पोटाचे आजार निर्माण करू शकतात. नोरोव्हायरस, रोटाव्हायरस यामुळे उलट्या-जुलाब होऊ शकतात. स्टॅफिलोकोकस आणि इतर त्वचेवरील जंतू संसर्ग पसरवतात. फ्लश करताना हवेत उडणारे थेंब (“टॉयलेट प्लूम”) दोन मीटरपर्यंत जंतू पसरवतात.

टॉयलेट सीटपेक्षा धोकादायक काय?

अभ्यासानुसार, टॉयलेट सीटपेक्षा जास्त जंतू दाराचे हँडल, नळाचे हँडल आणि फ्लश लीव्हरवर आढळतात. कारण लोक सतत हात धुतल्याशिवाय हे भाग वापरतात.

जंतू कसे पसरतात?

1.सीट किंवा हँडल्सला स्पर्श केल्यावर

2.हात तोंड, डोळे किंवा अन्नाला लावल्यानं

3.फ्लशनंतर हवेत उडणारे सूक्ष्म थेंब श्वासातून आत गेल्यानं

4.टॉयलेट पाणी उडाल्यानं

स्वतःचं संरक्षण कसं करावं?

1.शक्य असल्यास सीट कव्हर किंवा टॉयलेट पेपर वापरा

2.सीट व झाकण अल्कोहोल वाईपने स्वच्छ करा

3.फ्लशपूर्वी झाकण बंद करा

4.२० सेकंद हात साबणाने धुवा

5.हँड ड्रायरऐवजी पेपर टॉवेल वापरा

6.टॉयलेटमध्ये फोन वापरू नका

7.बाळांच्या चेंजिंग एरियाचा वापर करण्यापूर्वी व नंतर स्वच्छता करा.

रोगप्रतिकार शक्ती चांगली असलेल्या लोकांना सार्वजनिक टॉयलेट सीटवर बसल्यानं फारसा धोका नसतो. खरा धोका हात धुतले नाहीत, फ्लशनंतर हवेत पसरलेले थेंब आणि फोन वापरण्यामुळे वाढतो. म्हणून लक्षात ठेवा सीट स्वच्छ करा, हात धुवा आणि फोनचा वापर टाळा. एवढी काळजी घेतली, तर सार्वजनिक शौचालयं वापरणं तितकंसं धोकादायक नाही.

Comments are closed.