राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी

राज्यात पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे, पण पालकमंत्री त्यांच्या जिल्ह्यात पाहणी साठी गेले नाही अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात इतके नुकसान झाले आहे,पालकमंत्री अजून त्या जिल्ह्यात पाहणी करायला गेलेल नाही, पंचनामे झालेलं नाही. आजच्या बैठकीत मंत्र्यांना जिल्ह्यात जाऊन पाहणी करायला सांगितले पाहिजे. तसेच या आठवड्यात पावसाचा जोर वाढणार आहे त्यामुळे लोकांना त्वरित सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावे.

विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यात पिकांचे , जनावरांचे लोकांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे आजच्या बैठकीत सरकारने या दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

https://www.youtube.com/watch?v=H1UQIFXSROI

Comments are closed.