2025 आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा कोणाच्या नावावर? पाहा संपूर्ण यादी
Asia Cup 2025 : आशिया कप आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सध्या स्पर्धेत सुपर-4 चे सामने खेळले जात आहेत. या स्पर्धेत अनेक फलंदाजांनी आपल्या देशासाठी उत्तम कामगिरी केली आहे. आतापर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या टॉप-5 यादीत पहिल्या क्रमांकावर भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा आहे. त्याने 4 सामन्यांत सर्वाधिक 173 धावा केल्या आहेत. तर गोलंदाजांच्या टॉप-5 यादीतही पहिल्या क्रमांकावर भारतीय गोलंदाजाचे नाव आहे. या भारतीय गोलंदाजाने 4 सामन्यांत 9 बळी घेतले आहेत.
आशिया कप 2025 मध्ये भारतीय संघाचे वर्चस्व राहिले आहे. भारतीय संघ आतापर्यंत स्पर्धेत अपराजित आहे आणि भारतीय खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत आपला जलवा दाखवला आहे. भारतीय संघाने सर्व सामने जिंकून अंतिम फेरीच्या शर्यतीत सर्वात आघाडी घेतली आहे. तर सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत भारताचा कुलदीप यादव अव्वल ठरला आहे.
आशिया कप 2025 मध्ये सलामीवीर अभिषेक शर्माने आपल्या तडाखेबाज फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. तो स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. अभिषेकने संपूर्ण स्पर्धेत 208 च्या उत्कृष्ट स्ट्राइक रेटने फलंदाजी करत आतापर्यंत 4 सामन्यांत 173 धावा केल्या आहेत.
आशिया कप 2025 मध्ये भारतीय फिरकीपटू कुलदीप यादव आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे भरपूर चर्चेत आहेत. तो स्पर्धेत सर्वाधिक बळी घेण्याच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. कुलदीपने आतापर्यंत 4 सामन्यांत 9 बळी घेतले आहेत.
Comments are closed.