1 कोटींचा फंड 10 वर्षात जमा करण्याचं ध्येय, दरमहा किती रुपयांची एसआयपी करावी लागेल? जाणून घ्या समीकरण

भारतीय शेअर बाजार विदेशी गुंतवणूकदारांकडून त्यांच्या समभागांची विक्री होत असली तरी भारतीय गुंतवणूकदारांनी सावरला आहे. भारतीय गुंतवणूकदार शेअर बाजारात गुंतवणूक करत असतात. म्युच्युअल फंडामध्ये एसआयपीद्वारे हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाते. एसआयपी हा गुंतवणुकीचा शिस्तबद्ध प्रकार मानला जातो. ठराविक रक्कम तुम्ही दरमहा निवडलेल्या म्युच्युअल फंडमध्ये जमा केली जाते. त्या बदल्यात गुंतवणूकदारांना एनएव्हीवर आधारित यूनिट मिळतात.

एसआयपीची सुरुवात 500 रुपयांपासून देखील करता येते. छोट्या गुंतवणुकीनं सुरुवात करुन मोठा टप्पा गाठता येऊ शकतो. एसआयपीच्या गुंतवणुकीवर साधारणपणे दरवर्षी 12 टक्के सीएजीआरनं परतावा मिळेल, असं अपेक्षित धरल जातं. एसआयपी सुरु केल्यानंतर प्रत्येक वर्षी 10 टक्के रक्कम वाढवत गेल्यास मोठा फंड तयार होण्यात मदत होते.

समजा जर एखाद्या गुंतवणूकदाराला 1 कोटी रुपयांचा फंड 10 वर्षात जमा करायचा असेल तर त्याला 12 टक्के सीएजीआर अपेक्षित धरल्यास दरमहा 43150 रुपयांची गुंतवणूक एसआयपीद्वारे करावी लागेल.  समजा जर तुमच्या पोर्टफोलिओतून तुम्हाला दरमहा 14 टक्के सीएजीआर मिळाला तर तुम्हाला 38250 रुपयांची एसआयपी करावी लागेल. मात्र, यासाठी म्युच्युअल फंड निवडताना इक्विटी म्युच्युअल फंडची निवड करावी लागेल.

नियमित गुंतवणूक, दीर्घ कालावधी आणि योग्य परतावा याच्याद्वारे आर्थिक ध्येय गाठू शकता. एसआयपीद्वारे गुंतवणूक करताना कम्पाऊंडिंगचा देखील लाभ होतो. योजनाबद्ध पद्धतीनं शिस्तीबद्धपणे गुंतवणूक केल्यास 1 कोटींचा फंड तयार होऊ शकतो.

ऑगस्ट महिन्यात शेअर बाजारात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र, एसआयपीद्वारे शेअर बाजारात  28265 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली.  ऑगस्ट महिन्यात 8.99 कोटी एसआयपी खात्यातून ही गुंतवणूक करण्यात आली. एसआयपीद्वारे होणाऱ्या गुंतवणुकीचा शेअर बाजाराला आधार मिळाला आहे.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

येथे प्रकाशितः 23 सप्टेंबर 2025 08:47 पंतप्रधान (आयएसटी)

Comments are closed.