वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटीसाठी या दिवशी होणार टीम इंडियाची घोषणा! हे दोन खेळाडू संघाबाहेर राहणार?
आशिया कप 2025 (Asia Cup 2025) संपल्यानंतर काही दिवसांतच भारत आणि वेस्ट इंडिजच्या दरम्यान कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 च्या मोहिमेत टीम इंडियाची दुसरी कसोटी मालिका असेल. वेस्ट इंडिज कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा 24 सप्टेंबरला होऊ शकते. इंग्लंड दौऱ्यावर खराब कामगिरीमुळे करुण नायरला (Karun Nair) कसोटी संघातून बाहेर ठेवले जाऊ शकते. तर, सध्या दुखापतीने ग्रस्त असलेल्या रिषभ पंतवरही (Rishbh Pant) निर्णय घ्यावा लागणार आहे.
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाचे (BCCI) सचिव देवजीत सैकिया यांनी पुष्टी केली आहे की, बुधवारी एका बैठकीनंतर भारतीय संघाची घोषणा केली जाईल. क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, करुण नायरला संघात जागा मिळणे कठीण आहे, कारण इंग्लंड दौऱ्यावर त्याने 8 फलंदाजीच्या सामन्यात फक्त 205 धावा केल्या होत्या. रिषभ पंत दुखापतीमुळे उपलब्ध नसल्याने ध्रुव जुरेल (Dhruv jurel) हा विकेटकीपर म्हणून पहिला पर्याय मानला जात आहे. बॅकअप म्हणून एन. जगदीशनला संघात स्थान मिळू शकते.
रिपोर्टनुसार, देवदत्त पडिक्कलला मधल्या फळीत संधी मिळू शकते. नितीश कुमार रेड्डीच्या निवडीवरही चर्चा होत आहे, पण संघात कोणताही वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू नसल्याने निवडकांना त्याला संघात ठेवावं लागू शकतं.
श्रेयस अय्यरला इंग्लंड दौऱ्यावर भारतीय कसोटी संघात जागा मिळाली नव्हती. त्यानंतर त्याला आशिया कपसाठीटी टी20 संघातूनही बाहेर ठेवले गेले. अय्यर चँपियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियासाठी खेळताना दिसला, जिथे तो संघाचा टॉप स्कोरर होता. वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेसाठी त्याला कसोटी संघात घेण्याची कुठलीही माहिती आता पर्यंत आली नाही.
Comments are closed.