आशिया चषक सुरु असताना ‘या’ देशाचं क्रिकेट बोर्ड निलंबित, आयसीसीची कारवाई, टी 20 वर्ल्ड खेळणार?


दुबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं यूएसए क्रिकेट बोर्डाला निलंबित केलं आहे. या निर्णयामुळं यूएसए म्हणजेच अमेरिकेच्या क्रिकेट बोर्डात प्रशासकीय बदल करावे लागणार आहेत. मंगळवारी आयसीसीच्या ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अमेरिकेचं क्रिकेट बोर्ड निलंबित झालं असलं तरी 2026 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये ते सहभागी होऊ शकतील. पुढील वर्ष टी 20 वर्ल्ड कप भारत आणि श्रीलंकेत होणार आहे.

आयसीसीकडे अमेरिका क्रिकेट बोर्डाशी संबंधित तक्रारी आल्या होत्या. गेल्या वर्षी श्रीलंकेतील वार्षिक बैठकीत हा विषय समोर आल्यानंतर यूएसए क्रिकेट बोर्डाला नोटीस पाठवण्यात आली होती. या वर्षी सिंगापूरमध्ये वार्षिक परिषद झाली त्यावेळी यूएसए क्रिकेट बोर्डाला व्यवस्थित रचना तयार करण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. आयसीसीनं सातत्यानं अमेरिकन क्रिकेट बोर्डाला आणि त्यांचे चेअरमन वेणू पीसीके यांना इशारा दिला होता. प्रशासन पारदर्शक आणि फेअर प्रक्रिया असावी असं आयसीसीनं सांगितलं होतं.

यूएसए क्रिकेट बोर्डानं निवडणुकीपूर्वी बोर्डात उमदेवारांची चुकीची निवड आणि काही विशेष व्यक्कींसाठी आवश्यकतेनुसार बदल केल्याची प्रकरणं समोर आली आहेत. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या मते यूएस क्रिकेट बोर्डाचे चेअरमन वेणू पीसीके यांनी ते निलंबनासंदर्भात आयसीसीच्या संपर्कात नाहीत. या निलंबनाचा 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळण्यावर परिणाम होणार नाही. अमेरिका त्या सहा संघांपैकी एक असू शकते जी 2028 चं ऑलिम्पिक खेळेल.

यूएसए ऑलिम्पिक आणि पॅरालंपिक समितीनं देखील यूएसए क्रिकेट बोर्डातील बदलांचं समर्थन केलं आहे. या प्रकरण आयसीसी आणि यूएसओपीसी सहमत आहेत. सातत्यानं प्रयत्न करुनही वेणू पीसीके पद सोडायला तयार नाहीत.त्यांनी त्यांच्या साथीदारांना देखील पद सोडू नये असं सांगितलं अरहे?

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.