'टॅटूंग' दात 'ट्रेंड'
चीन या देशातील लोक बऱ्याच चित्रविचित्र क्रिया करतात हे सवश्रुत आहे. त्यामुळे जगाच्या इतर भागांमध्ये नसलेले ‘ट्रेंडस्’ चीनमध्ये लोकप्रिय होतात. सध्या असाच एक ‘आऊट ऑफ बॉक्स’ ट्रेंड या देशात लोकप्रिय होत आहे. तो आहे, स्वत:च्या दातांवर ‘टॅटू’ कोरुन घेण्याचा. चीनमधील अनेक तरुण-तरुणी सध्या दातांवर कोरीवकाम करुन घेण्याच्या मागे लागलेले आहेत. सर्वसाधारणत: टॅटू स्वत:च्या त्वचेवर काढून घेतला जातो. पण चीनमध्ये अनोख्या पद्धतीने दातांवर हे काम केले जाते. या टॅटूमध्ये वेलबुट्ट्या, नक्षीकाम इतकेच नव्हे, तर आपल्याला आवडणाऱ्या माणसांचे किंवा आपल्या मित्रमैत्रिणींचे चेहरेही दातांवर करुन घेण्याची फॅशन येथे रुढ होऊ लागली आहे. पण यात एक मेख आहे. त्वचेवर जो टॅटू काढला जातो, तो प्रत्यक्ष त्वचेवरच कोरला जातो. दातांवरच्या टॅटूचे पुष्कळदा तसे नसते. हे टॅटू प्रथम एका ‘कॅप’वर काढले जातात. नंतर अशा टॅटूयुक्त ‘कॅपस्’ दातांवर चढविल्या जातात. त्यामुळे टॅटू दातांवरच काढला आहे, असा आभास निर्माण होतो. तसेच, हे टॅटू मनाप्रमाणे बदलता येतात. हे ‘नकली’ टॅटू असतात.
तथापि, काही तरुण मात्र प्रत्यक्ष दातांवरच ते कोरुन घेतात. पण असे करणाऱ्यांची संख्या बरीच कमी असल्याचे दिसून येते. याचाच अर्थ असा, की चीनमध्ये अनेकांच्या दातांवरील टॅटूही ‘नकली’ असू शकतात. कोणत्याही चीनी वस्तूचे हे वैशिष्ट्या आहे. ती वरुन दिसायला ‘अस्सल’ असली तरी ती प्रत्यक्षात ‘नकली’ असते. चीनमधील दातांवरचा टॅटूही चीनच्या या वैशिष्ट्याला अपवाद नाही, हेच पुष्कळदा दिसून येते. तरीही ही फॅशन तेथे रुढ होताना दिसत आहे.
Comments are closed.