सरकारी रुग्णालयात हृदय, फुप्फुस, लिव्हर प्रत्यारोपणही विनामूल्य होणार, गरीब रुग्णांना मोठा दिलासा

अवयव प्रत्यारोपणासाठी खासगी रुग्णालयात लाखो रुपये खर्च होतो. सरकारी रुग्णालयांमध्येही फक्त किडनी प्रत्यारोपण होते. त्यासाठीही रुग्णांना मोठा खर्च होतो. सरकारी रुग्णालयात केवळ पाच लाखांपर्यंत खर्च आरोग्य योजनांतून विनामूल्य होतो. आता त्यापेक्षा जास्त खर्च झाला तरी रुग्णांना उपचार मिळणार आहेत. पाच लाखांपेक्षा जास्त खर्च होणाऱ्या 9 दुर्धर आजारांवर गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहेत. त्यात हृदय, किडनी, फुप्फुस, अस्थिमज्जा प्रत्यारोपणाचाही समावेश आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. त्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. त्यामुळे लाखो गरीब व गरजू रुग्णांना दिलासा मिळणार आहे. विस्तारित महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत रुग्णांच्या दाव्यापोटी मिळणारी रक्कम राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या राखीव निधीसाठी तसेच शासकीय रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी खर्च केली जाणार आहे.

महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत शासकीय रुग्णालयांना, आरोग्य संस्थांना राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून निधी दिला जातो. यापुढे सोसायटीकडून मिळणाऱ्या निधीपैकी 20 टक्के रक्कम राखीव निधीसाठी जाणार आहे, तर उर्वरित 80 टक्के रक्कम संबंधित रुग्णालयांना पायाभूत सुविधा, औषधे व साहित्य खरेदी, प्रोत्साहन भत्ते, माहिती व प्रचार प्रसिद्धीसाठी दिली जाणार आहे.

उपचारांच्या दरांमध्येही बदल होणार

या योजनांतर्गत करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिया, उपचार व त्यांच्या दरांमध्ये बदल करणे, मिळणाऱ्या शासकीय निधीचा तसेच राखीव निधीच्या विनियोगाबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली विशेष उपचार सहायता व सक्षमीकरण समितीचे गठन करण्यासही मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे.

या उपचारांसाठी मिळणार निधी

  • हृदय प्रत्यारोपण – 1.5 दशलक्ष
  • फुप्फुस प्रत्यारोपण – 20 लाख
  • हृदय व फुप्फुस प्रत्यारोपण – 20 लाख
  • यकृत प्रत्यारोपण – 22 लाख
  • अस्थिमज्जा प्रत्यारोपण (अलोजेनिक) – 9.5 लाख
  • Astimzza ट्रान्सप्लांट (असंबंधित) – 17 लाख
  • अस्थिमज्जा प्रत्यारोपण (हॅप्लो) – 17 लाख,
  • ट्रान्स कॅथेटर एऑर्टिक व्हॉल्व इम्प्लांटेशन (तावी) – 10 लाख
  • ट्रान्स कॅथेटर एऑर्टिक व्हॉल्व रिप्लेसमेंट (टीएमव्हीआर) – 10 लाख

Comments are closed.