करुणानिधीचा पुतळा निलंबित झाला

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

तामिळनाडूचे विख्यात दिवंगत नेते एम. करुणानिधी यांचा पुतळा स्थापन करण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. हा पुतळा तामिळनाडूतील थिरुनेलवेल्ली या नगरातील मुख्य मार्गावर भाजीबाजाराच्या प्रवेश द्वारावर स्थापन करण्याची तामिळनाडू सरकारची योजना आहे. तथापि, नेत्यांचे दैवतीकरण करण्यासाठी जनतेचा पैसा खर्च करणे अयोग्य आहे. याची अनुमती दिली जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करत न्या. विक्रम नाथ आणि न्या. प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने या योजनेला स्थगिती दिली आहे. या संदर्भातील याचिका तामिळनाडू सरकारने सादर केली होती. मद्रास उच्च न्यायालयाने यापूर्वीच एका महत्वपूर्ण आदेशाद्वारे राज्यात नेत्यांचे पुतळे सार्वजनिक स्थानी उभे करण्यास स्थगिती दिली आहे. त्यामुळे तामिळनाडू सरकारने ही याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर केली होती. तथापि, आता सर्वोच्च न्यायालयानेही या योजनेला स्थगिती दिल्याने तामिळनाडू सरकारचा मोठाच अपेक्षाभंग झाला आहे. एम. करुणानिधी यांनी द्रमुक पक्षाच्या माध्यमातून सात दशके तामिळनाडूच्या राजकारणावर आपला ठसा उमटविला होता. त्यांनी अनेकदा या राज्याचे मुख्यमंत्रीपदही भूषविले होते.

Comments are closed.