मुंबई लोकल – वाघेरी ग्रामविकास मंडळाचे दसरा स्नेहसंमेलन

लायन्स क्लब ऑफ मिडटाऊनतर्फे माझगांव, ताडवाडी येथील सर एली कदुरी स्कूलमधील शिक्षिका श्रुती संजय राणे यांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार माजी नगरपाल जगन्नाथ हेगडे यांच्या हस्ते काळाचौकी येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. शैक्षणिक वर्ष 2025-26साठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर काwतुकाचा वर्षाव होत आहे.
मोहन जाधव यांचे एकल चित्रप्रदर्शन
ख्यातनाम समकालीन चित्रकार मोहन जाधव यांचे अत्यंत प्रतीक्षित ‘संस्कृतीच्या रंगरेषा’ हे चित्रप्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे 30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या दरम्यान भरविण्यात येणार आहे. जाधव यांच्या कलाकृतींमध्ये निसर्गाचे जिवंत रंग, भावनांची खोली आणि इंप्रेशनिस्टिक शैलीचा स्पर्श दिसून येतो. संस्कृतीच्या रंगरेषांचाही या प्रदर्शनात समावेश आहे. संगीतकार या मालिकेत भारतीय संगीत परंपरेला वाहिलेली ही कलात्मक आदरांजली आहे. तर नंदी ही जाधव यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवलेली मालिका. नंदी – पौराणिक, धार्मिक आणि कृषी जीवनातील महत्त्वपूर्ण प्रतीक आहे. याचे चित्रण रंगीबेरंगी शिंगे, झुल, घंटा, घुंगरू आणि देखणे अलंकार यांच्या माध्यमातून केले आहे.
वाघेरी ग्रामविकास मंडळाचे दसरा स्नेहसंमेलन
वाघेरी ग्रामविकास मंडळातर्फे दहावी, बारावी व पदवी विद्यार्थ्यांचे गुणगौरव पुरस्कार वितरण गुरुवार 2 ऑक्टोबर रोजी मंडळाचे अध्यक्ष प्रमोद धैर्यधर रावराणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सह्याद्री विद्यामंदिर, श्री शिवाजी महाराज तलाव, भांडुप (प) येथे सांयकाळी 4. 30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. तरी ग्रामस्थांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे चिटणीस डॉ. संतोष रावराणे यांनी केले आहे.
Comments are closed.