दिंडोशीतील पाणी पुरवठा सुरळीत करा, अन्यथा जोरदार आंदोलन! शिवसेनेचा राज्य सरकार व पालिकेला इशारा

राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दिंडोशी विधानसभा क्षेत्रात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने रहिवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे दिंडोशीवासीयांना तातडीने मुबलक पाणी पुरवठा करावा; अन्यथ जोरदार आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना नेते, आमदार सुनील प्रभू यांनी दिला आहे.
गणेशोत्सवानंतर मुंबईच्या उत्तर उपनगरातील विविध भागांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत होती. कुरारगाव दिंडोशी, नागरी निवारा, संतोष नगर, पिंपरीपाडा, कोकणी पाडा, दत्तवाडी, बाणडोंगरी, तानाजी नगर, क्रांतीनगर, महाराष्ट्र नगर आणि आप्पा पाडा या परिसरांमध्ये नागरिकांना पाण्याचा अत्यल्प व कमी दाबाने होणारा पुरवठा यामुळे प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत होता. याबाबत स्थानिक पातळीवर सातत्याने पाठपुरावा करूनही कोणताही ठोस निर्णय न झाल्यामुळे आज मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त तसेच जल अभियंता माळवदे यांच्यासमवेत वरळी येथील इंजिनीअरिंग हब मुख्य कार्यालयात विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीला माजी उपमहापौर सुहास वाडकर, माजी स्थापत्य समिती अध्यक्ष तुळशीराम शिंदे तसेच विभागातील उपविभाग प्रमुख प्रदीप निकम आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
असे झाले निर्णय
तातडीने पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश
संतोष नगर ए 1 बेकरी येथे पाण्याची नवी टाकी
अप्पा पाडा येथे नव्या पंपिंग स्टेशनासाठी जागा उपलब्धता
संपूर्ण विधानसभा क्षेत्रात पाणी पुरवठा सुरळीत करणे
Comments are closed.