VIDEO: हारिसने केली एअरक्राफ्ट पाडल्याची अ‍ॅक्शन; अर्शदीपचंही प्रत्युत्तर; सर्व भारतीयांकडून कौ


हॅरिस रफवरील आर्शदीप सिंग: आशिया चषक 2025 च्या स्पर्धेतील (Asia Cup 2025) सुपर-4 मध्ये भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात 21 सप्टेंबर रोजी सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने 6 विकेट्स पाकिस्तानचा पराभव केला. आशिया चषकाच्या या स्पर्धेत भारताने सलग दुसऱ्यांदा पाकिस्तानला लोळवलं. भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यात पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ त्याच्या नापाक हरकतींमुळे चांगलाच चर्चेत राहिला.

भारतविरुद्धच्या सामन्यात हारिस रौफ भारतीय फलंदाजांना वारंवार चिथवण्याचा प्रयत्न करत होता. तसेच दुसऱ्या डावात म्हणजेच भारत जेव्हा फलंदाजी करत होता, त्यादरम्यानचा एक व्हिडीओ देखील समोर आला. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ मैदानात फलंदाजी करत असताना मैदानातील प्रेक्षकांना हाताने एअरक्राफ्ट पाडल्याची अ‍ॅक्शन करुन डिवचत होता. या हारिस रौफला भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगनेही प्रत्युत्तर दिलं. भारत आणि पाकिस्तानचा सामना संपल्यानंतरचा अर्शदीप सिंगचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओद्वारे अर्शदीपने हारिफ रौफने केलेल्या अॅक्शनवर प्रत्युत्तर दिलं आहे. त्यानंतर सर्व भारतीयांकडून सोशल मीडियावर अर्शदीपचं कौतुक करण्यात येत आहे. दरम्यान, आशिया चषकाच्या स्पर्धेसाठी अर्शदीप सिंगचीही भारतीय संघात निवड झाली आहे. मात्र पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अर्शदीपला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नाही. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानविरुद्धचा सामना संपल्यानंतर अर्शदीप सिंगने हारिस रौफला प्रत्युत्तर दिलं.


अरशदीप सिंचन हॅरिस राऊफला प्रतिसाद, व्हिडिओ-


गोळीबारची अॅक्शन करुन सेलिब्रेशन करणारा साहिबजादा फरहान काय म्हणाला?

भारताविरुद्ध अर्धशतक झळकवल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचा सलामीवीर साहिबजादा फरहानने बॅटने गोळीबाराची अॅक्शन करुन सेलिब्रेशन केले होते. सदर प्रकरणानंतर सोशल मीडियावर साहिबजादा फरहानला चांगलेच ट्रोल करण्यात आले. तसेच साहिबजादा फरहानवर आयसीसीने कारवाई करावी, अशी मागणी देखील भारतीयांकडून करण्यात आली. या सर्व प्रकरणावर आता साहिबजादा फरहानने प्रतिक्रिया दिली आहे. मी जे गन सेलिब्रेशन केलं होतं, ती त्याक्षणी घडलेली तात्कालिक घटना होती. खरंतर मी 50 धावा काढल्यावर फारसं सेलिब्रेशन करत नाही. मात्र अचानक माझ्या डोक्यात आलं आणि मी त्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं. यावर लोक काय प्रतिक्रिया देतील याची मला कल्पना नव्हती आणि त्याची पर्वाही मी केली नाही. तुम्हाला जिथे खेळायचं आहे तिथे आक्रमक होऊन खेळलं पाहिजे.

संबंधित बातमी:

Haris Rauf Wife Post Ind vs Pak Asia Cup 2025: आधी हारिस रौफने मैदानात नको नको ते केलं; आता पत्नी मुझनाच्या वादग्रस्त पोस्टने खळबळ, म्हणाली…

Abhishek Sharma Ind vs Pak Asia Cup 2025: साहिबजादा फरहानचं गोळीबार करत सेलिब्रेशन; अभिषेक शर्मानेही ‘L’ दाखवले, आता स्वत:ने अर्थही सांगितला!

आणखी वाचा

Comments are closed.