डोंबिवलीत भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या नेत्याला नेसवली साडी; घटनेनंतर पगारे मामांचा वाढला
डोंबिवली : कल्याणमध्ये काँग्रेस पदाधिकारी प्रकाश उर्फ मामा पगारे (Kalyan BJP vs Congress) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. यानंतर संतप्त झालेल्या कल्याण जिल्हा भाजप पदाधिकाऱ्यांनी मामा पगारेंना भर रस्त्यात साडी नेसवली. भाजप नेत्यांची बदनामी करणाऱ्यांवर अशीच वेळ येणार, असा इशारा भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Kalyan BJP vs Congress) झाला आहे. या प्रकरणामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी पगारेंना साडी नेसवणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. मामा पगारे हे मागासवर्गीय असल्याने त्यांच्यावर अट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे. अट्रॉसिटी दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन सोडणार नाही, असा पवित्रा काँग्रेसने घेतला आहे. ‘मला साडी नेसवा नाहीतर काहीही करा मी काँग्रेससाठी जीव जाईपर्यंत लढणार’ अशी प्रतिक्रिया मामा पगारेंनी दिली आहे.(Kalyan BJP vs Congress)
Kalyan BJP vs Congress: मोदी यांचा आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर फॉरवर्ड केल्याने भाजप कार्यकर्ते संतप्त
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर फॉरवर्ड करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश ऊर्फ मामा पगारे यांना भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, संदीप माळी, दत्ता माळेकर आदींनी भररस्त्यात साडी नेसवल्याची घटना मंगळवारी डोंबिवलीत मानपाडा रस्त्यावर घडली. त्या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले. कट्टर काँग्रेस नेते अशी ओळख असलेले पगारे यांनी पंतप्रधान मोदी यांचा आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर फॉरवर्ड केल्याने भाजप कार्यकर्ते संतप्त झाले होते. भाजप पदाधिकाऱ्यांनी पगारे यांना शिवीगाळ करत, धक्काबुक्की करत, हात पकडून त्यांना साडी नेसवून त्यांचा जाहीर निषेध केला. त्यावेळी जातिवाचक शिवीगाळ केल्याचे पगारे यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधानांची बदनामी करायची तुमची लायकी आहे का, असे भाजप कार्यकर्ते पगारे यांना सुनावत असल्याचे व पुन्हा असे करण्याची हिंमत कराल का, असा इशारा देत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. भाजपचे नंदू परब यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात पगारे यांनी फॉरवर्ड केलेल्या पोस्टसंदर्भात निवेदन दिले होते. भाजप पदाधिकाऱ्यांविरोधात कारवाईच्या मागणीसाठी काँग्रेसचे शिष्टमंडळ कल्याण येथे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या कार्यालयात गेले होते. तेथे चर्चा करताना मामा पगारे यांचा रक्तदाब वाढला. त्यानंतर ते बेशुद्ध झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेल्याचे सांगण्यात आले.
पगारे मामा यांची तब्येत बिघडली; खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
या घटनेनंतर प्रकाश पगारे उर्फ मामा पगारे यांची तब्येत खालावली आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या छातीत दुखत असल्याने कल्याणच्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मामा पगारे यांनी संघासह भाजप सोबत काम केले होते, त्यावेळी विचारांची लढाई होती, आता गुंडगिरी सुरू आहे. माझा डोळ्यासमोर लहानाचे मोठे झालेल्यांनी माझ्यासोबत हा प्रकार केला. मी त्यांच्या वडिलांसारखा आहे, त्यांनी असे करायला नको होतं, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. त्यांना २४ तासांसाठी डॉक्टरांच्या ऑब्झर्वेशनखाली ठेवण्यात आले आहे.
https://www.youtube.com/watch?v=iiqeqeuozuor4
आणखी वाचा
Comments are closed.