तुमच्या घरातील ही जागा ठरू शकते जीवघेणी, डॉक्टरांचा इशारा

आपलं घर ही सर्वात सुरक्षित जागा मानली जाते. पण, तुमच्या घरातीलच एक अशी जागा आहे जी जीवघेणी ठरू शकते. दरवर्षी जगभरात हजारो लोकांचा मृत्यू किंवा गंभीर प्रकृती या जागेमुळे झाल्याचे समोर आले आहे. ही जागा म्हणजे आपलं बाथरूम.
बाथरूममध्ये का घडतो जीवघेणा धोका?
प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञांनी एका पोस्टद्वारे सांगितलं आहे की, बाथरूममध्ये बसल्यावर अनेकदा बद्धकोष्ठतेमुळे ताण येतो. त्या वेळी शरीरात वलसाल्वा मॅन्युव्हर नावाची प्रक्रिया सुरू होते. म्हणजेच श्वास रोखून जबरदस्तीने दाब देण्याची क्रिया. यामुळे छातीतील दाब वाढतो, हृदयाकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होतो आणि मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा घटतो. त्यामुळे लोक बेशुद्ध होणे किंवा अचानक मृत्यू होण्याची शक्यता निर्माण होते.
कोणत्या लोकांना धोका जास्त?
हृदयरोग असलेले रुग्ण, अनियमित हृदयस्पंदन (Arrhythmia) असलेले लोक, उच्च रक्तदाब किंवा रक्तदाब कमी करणारी औषधे घेणारे रुग्ण, दीर्घकाळ बद्धकोष्ठतेने त्रस्त असलेले लोक
बद्धकोष्ठतेची कारणं
1. फायबरयुक्त आहाराचा अभाव
2. पाणी कमी पिणं
3. व्यायामाचा अभाव
4. जीवनशैलीतील अनियमितता
5. औषधांचे दुष्परिणाम
कधी घ्यावी डॉक्टरांची मदत?
जर बद्धकोष्ठतेसोबत सतत वेदना होत असतील, मलासोबत रक्त येत असेल किंवा तीन आठवड्यांहून अधिक काळ त्रास सुरू असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आपलं घर जरी सुरक्षित वाटलं, तरीही बाथरूमसारख्या जागेतील छोटासा त्रासही जीवघेणा ठरू शकतो. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वेळेवर उपचार यामुळे हा धोका कमी करता येऊ शकतो.

Comments are closed.